प्रकाशचित्र – आळंदी आणि बर्ड व्हाँली उद्यान पुणे
Views: 194
प्रकाशचित्र – आळंदी आणि बर्ड व्हाँली उद्यान पुणे Read More »
सनी दातमोजे हा तसा दिलदार माणूस. किडकिडीत दंड, भारदार कपाळ आणि तेवढेच मोठे मन. मित्रात रमणारा आणि मित्रांना सतत मदत करणारा सनी मित्रांचा यार आहे. लहानपणी खोड्या करताना तोंडावर पडून काही दात पडले होते आणि एक दात अर्धा तुटला होता. त्यामुळे सगळे त्याला दातमोजे म्हणायचे. घरी त्याची फक्त प्रेमळ आई होती. सनी आईचा एकुलता एक असल्यामुळे लाडका होता. त्यामुळे दिवसभर टुकारगिरी करत, उंडारत फिरणे. दादा साहेबानी काम सांगितल्यास ते करत फिरणे यावाचून त्याला दुसरे काही काम नव्हते. दादा साहेब हे गावाचे राजकीय, वजनदार आणि दमदार व्यक्तिमत्व. त्यांना सगळे गाव मानायचे. दादा साहेबांना सनी सुद्धा खूप मानायचा. तो तर त्यांचा खरा आणि स्व: घोषित कार्यकर्ता होता.
ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर” Read More »
सण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भारतीय शेतकऱ्याची शेतीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गाशी आपले नाते दृढ करत असतो. या सणाला शेतीच्या रब्बी हंगामाची पार्श्वभूमी आहे. या दिवसात रब्बीचा हंगाम जोरात असतो. मराठवाडाच्या भूमीत अनेक सण, परंपरा, चाली रीती साजऱ्या केल्या जातात. सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी सण कुटुंबा सोबत साजरा करण्याची वेगळीच मज्जा असते.
ब्लॉग – लेख – “वेळा अमावास्या” सण Read More »
बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्वच्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आज आप्पा खुप खुष होते. दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. आजोबा सोबत तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही. पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत. तिला जाणवले आप्पाच्या बोलण्यात एक शब्द सारखा येत होता. तो म्हणजे “मला काही अपेक्षा नाही” आत्ता यमराज जरी आले तरी मी जाण्यास तयार आहे. तिच्या मनात विचार आला की आप्पा सतत असा का विचार करत असावेत.