बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्वच्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आज आप्पा खुप खुष होते. दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. आजोबा सोबत तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही. पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत. तिला जाणवले आप्पाच्या बोलण्यात एक शब्द सारखा येत होता. तो म्हणजे “मला काही अपेक्षा नाही” आत्ता यमराज जरी आले तरी मी जाण्यास तयार आहे. तिच्या मनात विचार आला की आप्पा सतत असा का विचार करत असावेत.
आप्पाना उदास बघून बागेश्रीने आई वसुधाला विचारले आजोबा बद्दल तर तिने बरीच माहिती पुरविली. आप्पा कसे आयुष्यात बरीच धावपळ करून थकले आहेत. आप्पा कधी-कधी जुन्या आठवणीत कसे रमून जातात. आनंद आणि वसुधाच्या लहानपणी दिवाळी कशी साजरी करायचे हे आठवायचे. वसुधाची आई लवकरच वारल्या मुळे मुलांचे करण्यात त्याचा कसा दिवस जायचा हेच त्यांना उमगायचे नाही. आप्पानी मुलांसाठी घेतलेले कष्ट याला तर गिणतीच नव्हती. जबाबदारी मुळे खुप वेळेस केलेले त्याग त्यांना दुसर्या समोर उगाळायची आप्पाला सवय नव्हती ही गोष्ट वसुधा जाणून होती.आप्पा कधी-कधी विचार करताना त्याचे स्वतःचे आयुष्य त्याच्या डोळ्या समोरून झरकन तरळून जायचे. आधी लहान बहीण आणि भावाची जबाबदारी त्यानंतर मुला मुलीची जबाबदारी. ना कोणाची साथ ना संगत. मनापासून सगळ्याचे करत आले. त्या वेळेस देवा कडून त्याची काही अपेक्षा नव्हती. सोने चांदीच्या दुकानात आप्पा साधे कारकुन होते अपार मेहनतीच्या बळावर त्यानी स्वत:चे दुकान सुरू केले आणि मालक बनले. मुला-मुलीचे लग्ना लावून देऊन आप्पा जवळपास जबाबदारीतून मुक्त झाले. हळूहळू त्याने दुकान सुद्धा मुलाला म्हणजे आनंदला सोपवले. लहानपणा पासून आप्पाला कधी मोकळे बसून माहीत नव्हते त्या मुळे नित्य नियमाने दुकानात जायचे. त्याची गिर्हाईक सांभाळायची एक वेगळी पद्धत होती. मुलाची गिर्हाईक करायची वेगळी पद्धत होती. त्यामुळे मुला आणि आप्पात कधी- कधी वाद होत. मुलाला वाटायचे वडीलांनी त्याच्या कामात ढवळा-ढवळ करू नये आणि आप्पाला वाटायचे की माझी इतक्या वर्षाची तपशर्या आहे दुकान चालवण्याची. पण मग वाद वाढले आणि आप्पाला पडती बाजू घ्यावी लागली. आप्पानी दुकानातून अंग काढून घेतले. नंतर त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. जरी बागेश्री बऱ्याच दिवसांनी सुट्टी साठी आली असली तरी नात्यातील अंतर तिला सुस्पष्ट दिसले.
बागेश्रीने विचार केला की ही नात्यातील कोंडी फुटायला पाहिजे पण तिला काही मार्ग सापडत नव्हता कारण तिचे आप्पा सोबत काही खास जमायचे नाही. असे एके दिवशी बागेश्री जुने फोटो पहात होती तिला आप्पाचा संतूर वाजवताना फोटो दिसला. पण तिला आठवत नव्हते की संतूर कधी उल्लेख सुद्धा आईच्या किंवा आप्पाच्या बोलण्यात आला होता. वसुधा ला सुद्धा यात काही विशेष माहिती नव्हती. मग आईने सांगितलेले आठवले की आप्पाची काहीच अशी विशेष आवड नव्हती. मग संतूर वाजवायचा फोटो कसा काय होता तिथे?आनंद आणि त्याचा नात्यातील अंतर हया सगळ्या गोष्टी बागेश्रीच्या जन्मानंतर सुरू झाल्या म्हणून आप्पा आपल्या नातीशी फटकून वागायचा. बागेश्रीचा बडबडा स्वभाव सुद्धा त्याला कारणीभूत होता. त्यामुळे आप्पाला तिच्या वागण्यात फक्त चुकाच दिसायच्या. आप्पा कडक स्वभावाचे असल्यामुळे बागेश्रीने त्यांच्या बद्दल कधीही आपलेपणा दाखवले नाही. एवढ्यात आप्पाचा स्वभाव जास्त चिडचिडा झाला होता.
नात्यातील अंतर कमी करण्यासाठी कोणी तरी पुढाकार घायला पाहिजे. बागेश्रीचे सतत प्रयत्न सुरू असतात पण त्यात विघ्न येत होते. एक दिवस आप्पा सकाळी चालायला जाताना बघून ती सुद्धा त्यांच्या मागे गेली. मग बागेत आप्पानी तिला बघितल्या नंतर त्याचा थोड्या गप्पा झाल्या. मग पूर्ण आठवडा ती दोघ एकत्र चालायला जात असत. एक दिवस बागेश्रीने आप्पाचा प्रसन्न चेहरा बघून संतूर बद्दल विचारले. आप्पानी त्याची थोडक्यात माहिती सांगितली. त्यांना संगीतात आवड होती पण जबाबदारी मुळे त्यांना काही आवड जोपासता आली नाही. त्या गोष्टीला होऊन आता बरीच वर्ष झाली होती. आणि तिथेच विषय संपला. दररोज ती आप्पाच्या आवडी निवडी बोलायची. तिच्या कॉलेज च्या मित्रा मैत्रिणी विषयी सांगायची.एक दिवस तिने आजूबाजूच्या संगीत प्रशिक्षण वर्गा विषयी माहिती काढली आणि जवळच तिला संतूरचे प्रशिक्षण वर्ग सापडले. तिने भेट देऊन तेथील प्रशिक्षकांना थोडक्यात आप्पा बद्दल माहिती दिली. मग वापास जायच्या दिवशी तिने आप्पाला त्या वर्गात घेऊन तिथे त्यांची नोंदणीचा प्रयत्न केला. आप्पानी त्या वेळेस ठाम नकार दिला. एक-दोन वेळेस रागवले सुद्धा. पण बागेश्रीने त्यांचे काही ऐकले नाही. ती आप्पाला म्हणाली तुम्ही तुमची पूर्ण हयात सगळ्यांचे करण्यासाठी घालवलीत आत्ता तुम्ही जीवनाच्या उतरार्थ स्वत: साठी जगा. तुम्ही सतत “मला काही अपेक्षा नाही आणि यमराज जरी आज आले तर मी यायला तयार आहे” हे म्हणू नका. जीवन सुंदर आहे ते तुम्ही परिपूर्ण जगा. पहिल्यांदा कोणी तरी एवढ्या तळमळीनी त्यांना काहीतरी सांगत होत. त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले.
आप्पांनी बागेश्रीला सांगीतले की त्यांच्या आणि आनंदच्या दुरावण्याला आप्पा बागेश्रीला जिमेद्दार समजायचे. या गैरसमजा साठी आप्पानी स्वत:ला फटकारले. तिच्या बालपणात कधीही तिच्या आवडी निवडीचा विचार केला नाही आणि आज तीच नात आप्पाला जीवनाचा दृष्टीकोन समजावून सांगत आहे. तिचे विचार आप्पाला पटले. आणि बागेश्रीला समजावून सांगीतल्या प्रमाणे रोज प्रशिक्षण वर्गात जायचे कबूल केले. बागेश्रीला मनापासून आनंद वाटत होता कारण त्यांच्या नात्यातील अंतर आत्ता कमी झाले होते. आप्पाला आज अत्यानंद झाला कारण त्यांच्या मनावरील मळभ दूर झाला होता. जरी मुला सोबत काही वाद झाले असले तरी त्यांना जीवनात आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क होता. पण एका माणसाच्या रागा पायी ते सतत चिडचिड करत होते. आप्पा आत्ता आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणार होते तेही दुसर्या कोणा साठी नसून स्वत: साठी. आणि त्यांना विशेष नवल वाटायचे की त्याचा सोबत आत्ता त्यांना समजून घेणारी मैत्रिण सुद्धा होती.
Views: 81