ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर”

सनी दातमोजे हा तसा दिलदार माणूस. किडकिडीत दंड, भारदार कपाळ आणि तेवढेच मोठे मन. मित्रात रमणारा आणि मित्रांना सतत मदत करणारा सनी मित्रांचा यार आहे. लहानपणी खोड्या करताना तोंडावर पडून काही दात पडले होते आणि एक दात अर्धा तुटला होता. त्यामुळे सगळे त्याला दातमोजे म्हणायचे. घरी त्याची फक्त प्रेमळ आई होती. सनी आईचा एकुलता एक असल्यामुळे लाडका होता. त्यामुळे दिवसभर टुकारगिरी करत, उंडारत फिरणे. दादा साहेबानी काम सांगितल्यास ते करत फिरणे यावाचून त्याला दुसरे काही काम नव्हते. दादा साहेब हे गावाचे राजकीय, वजनदार आणि दमदार व्यक्तिमत्व. त्यांना सगळे गाव मानायचे. दादा साहेबांना सनी सुद्धा खूप मानायचा. तो तर त्यांचा खरा आणि स्व: घोषित कार्यकर्ता होता.

ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर” Read More »