कविता

कविता

विडंबन

व्हाट्सअप वरच्या एका फेमस कवितेचे विडंबन
उद्या कदाचित तुमच्या नवराने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण तो काहीच चुकीच विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा…….
त्याचा फक्त एकच प्रश्न …….
कपाट माझे,
कपडे तुझ्या नावाचे.
मोबाइल माझा ,

विडंबन Read More »

अपेक्षा आणि फक्त अपेक्षा

आई कडून मायेची अपेक्षा
पत्नी कडून प्रेमाची अपेक्षा
बहिणी कडून मैत्रीची अपेक्षा
नात्यात खऱ्या प्रेमाची अपेक्षा

                                    शिक्षेत सूट मिळण्याची अपेक्षा
                                    दुःखात सुख असण्याची अपेक्षा
                                    सुखात जास्त पैसाची अपेक्षा
                                    जास्त पैशात मानाची अपेक्षा

अपेक्षा आणि फक्त अपेक्षा Read More »

आनंदा कुठे होतास तु

येताच होते स्वप्नांची पूर्ती
जाताना फक्त उदास मूर्ती
सोबत आणते जीवनात स्फुर्ती
बरोबर वाढत जातेे कीर्ती

                                     दुःखी असताना येते आठवण
                                     सुख मिळताच होते विसरण
                                     आनंद लुटायला येतात सर्वजण
                                     संकटात भेटत नाही एकपण

आनंदा कुठे होतास तु Read More »

जग जिंकु…

भ्रष्ट परंपरा ऊखडून
कष्ट सोसू हाडं झिजवून
अपमानाची झळ सोसून
जग जिंकू कष्टाचे दान देऊन

अपमानाचे विष रिचवून
जळी, स्थळी ध्येय साकारून
प्रयत्नांची आहुती टाकुन
जग जिंकू असीम हिम्मत दाखवून

जग जिंकु… Read More »

वधू – वर परिचय मेळावा

मध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग – लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग – तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण्यासाठी दगदग – दगदग
निमंत्रित करतात उदघाटनाने झगमग – झगमग
मुलांना परिचय देतांना वाटते धगधग – धगधग

मुलींची सुंदर दिसण्याचीे असते झटपट – झटपट
लहानाची स्नँकसाठीे आईकडे कटकट – कटकट
ऐका मागून एक स्थळ बघतात पटपट – पटपट
मुलींना प्रश्न विचारताच कापतात लटलट – लटलट
रिफ्रेश होण्यासाठी चहा पितात घटघट – घटघट

वधू – वर परिचय मेळावा Read More »

प्रवास – समृध्द अनुभव देणारा

अनोळखी व्यक्ती सोबत समृध्द अनुभव देणारा
कधी ओळखीचा, कधी अवघड, न बोलणारा

अंतर्मुख करणारा, अव्यक्त, कधीही न संपणारा
स्वतःच स्वतः ची ओळख घडवणारा

कधी उदास, प्रसन्न, रिफ्रेश करणारा
मौज मस्ती, बेधुंद, स्वप्न फुलवणारा

प्रवास – समृध्द अनुभव देणारा Read More »

नवीन वर्ष सुखात जावो

नवीन वर्षाचे स्वागत करायला शब्द सुचेना
मागील वर्षाचा आढावा घ्यायला वेळ पुरेना

वर्ष सरले, रंगवून विविध छटा सूर्य मावळला
गर्द अंधाराला झुगारून आशेचा किरण उगवला

मागील वर्षी लावलेल्या रोपाचे आता वृक्ष बनेल
मागील वर्षीच्या संकल्पांची आता पूर्तता होईल

नवीन वर्ष सुखात जावो Read More »

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती

आई म्हणजे. . . . . . .
लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती
मुला करता सत्यात उतरणारी कृती
लेकरां साठी भावनांची इच्छा पूर्ति
कुटुंबा साठी सतत धगधगणारी क्रांती

आई म्हणजे. . . . .. .
मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी युक्ती
सगळ्यांना घराची ओढ लावणारी व्यक्ति
कितीही संकटे आल्यास लढणारी शक्ति
आईची सेवा केल्यास मिळेल मोक्ष्याची प्राप्ती

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती Read More »