जग जिंकु…

या कवितेची “९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” च्या “कविकट्टा ” या सदरात निवड होऊन कविता वाचन झाले आहे. 

भ्रष्ट परंपरा ऊखडून
कष्ट सोसू हाडं झिजवून
अपमानाची झळ सोसून
जग जिंकू कष्टाचे दान देऊन

अपमानाचे विष रिचवून
जळी, स्थळी ध्येय साकारून
प्रयत्नांची आहुती टाकुन
जग जिंकू असीम हिम्मत दाखवून

संकटाचे जळमट खोडून
गुदमदनारा श्वास मोकळा सोडून
अन्यायाला वाच्या फोडून
जग जिंकू रक्ताचे पाणी करून

अश्रुला मागे सारून
प्रचंड ध्येया सक्तीने भारून
दु:ख, यातना पचवून
जग जिंकू क्षितिजापुढे विचार पोहचून

प्रामाणिकपणे भविष्य घडवुन
मेहनतीचा यज्ञ मांडून
कष्टाचे पर्वत चढून
जग जिंकू पूर्वजांची कर्तबगारी आठवून

अपमानाचा विखार पिऊन
परिस्थितीशी दोन हात लढून
अवहेलनेचा मारा झेलून
जग जिंकू गुलामगिरी मानसिकता तोडून

प्रश्नाचे गुब्बारे फोडुन
भविष्य घडवू अंधार घालवून
इच्छेचे दोर जोडून
जग जिंकू दुष्ट विचारांना नाकारून

असह्य वेदना विसरून
छत्रपतीचा प्रताप डोळ्यात साठवून
आईचा आशीर्वाद घेऊन
जग जिंकू उंच महत्वाकांक्षा ठेवून

Views: 38

Leave a Reply