आनंदा कुठे होतास तु

येताच होते स्वप्नांची पूर्ती
जाताना फक्त उदास मूर्ती
सोबत आणते जीवनात स्फुर्ती
बरोबर वाढत जातेे कीर्ती
                                     दुःखी असताना येते आठवण
सुख मिळताच होते विसरण
आनंद लुटायला येतात सर्वजण
संकटात भेटत नाही एकपण
अत्यानंदा मुळे चढते गुर्मी
सौख्य टिकण्यास लागते उर्मी
समस्येवर घाव घालु मर्मी
संकटावर मात करतो कर्मी
                                     आनंदात भेटतात सगळे जण
दुःखात विसरतात आपले पण
औदासीन्य म्हणजे एकटे पण
संघर्ष करून मिळते जाणते पण

Views: 100

Leave a Reply

Translate »