स्वलिखित “थोडं मनातलं... थोडं जनातलं...” पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!! 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

कविता: निरोप

आठवते का मित्रा सुंदर संध्याकाळ
तिथेच उघडली होती मैत्रीची टाकसाळ

तुला लक्षात आहे का आपला कट्टा
भांडलो तरी मैत्रीला लागला नाही बट्टा

का जातोस मित्रा नोकरीसाठी शहरात
मैत्रीचे छान मंदिर उभारू याच नगरात

आयुष्यात मैत्रीचा नवीन सूर्य उजळू दे
रखरखीत उन्हात जुने सवंगडी आठवू दे

कविता: निरोप Read More »

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती

पूर्वतयारी
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवी कट्टा या काव्य मंचा साठी मी माझी कविता जानेवारीत पाठवली होती. त्यावेळेस मी काही प्रवासाचे ठरवले नव्हते. बहुतेक हा मा‍झ्या नशीबात हा प्रवास लिहिलेला असेल. माझ्या कारने मला मोठा प्रवास करता आला नाही म्हणून मग मी कारने जायचे ठरवले. मी त्यासाठी मा‍झ्या दोन मित्रांना सुद्धा विचारले पण सुट्यांच्या कारणामुळे तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. आम्ही घरातील तिघे जाणार होतो पण ते नियोजन सुद्धा बारगळले. आपण नियोजन केल्या प्रमाणे प्रवास झाला तर तो प्रवास मजेचा थोडेच वाटतो? पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर मग प्रवासाच्या ५ दिवस अगोदर रेल्वेचा प्रवास निश्चित केला आणि नशीबाने तिकीटे उपलब्ध होती. मग काय पटापट तिकीटे आरक्षित केली. बारा किंवा तेरा तारखेच्या घोळा मध्ये मला थेट बारा तारखेचे पुणे अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेसचे तिकीट मिळाले. मग सगळे नियोजन अंबुजा सीमेंट प्रमाणे मजबूत झाले. मी तेरा तारखेला अहमदाबादला जाणार होतो आणि तेथून सोमनाथला दोन  दिवस राहणार होतो. मी फक्त सोमनाथ, दिव, आणि सासण गीर नॅशनल पार्क बघायचे नियोजन केले होते. पण एक विलक्षण योगायोग जुळून आला होता. कारण मी ज्या वेळेस कारने प्रवास करणार होतो त्यावेळेस मी जास्तीत जास्त अहमदाबाद पर्यंत जाऊन वापस येणार होतो. त्यात सोमनाथ दर्शनाच्या नियोजनाची काहीच आखणी नव्हती. पण बहुतेक ‘त्याची’ इच्छा असेल. माझा छोटासा कविता वाचनाचा कार्यक्रम होता पण पर्यटनाची संधी सोडेल तर काय कामाचे? ज्याप्रमाणे डेटा, कॉलिंग, आणि इतर एका पॅकमध्ये रिचार्ज करतो, त्याच प्रमाणे कुठेही जायचे असेल तर मी त्यात पर्यटन घुसवतोच. एकाच वेळेत ३ काम करायची सवय काही जात नाही.
दिनांक – १३ फेब्रुवारी (अहमदाबाद)तेरा तारखेला मी रेल्वेने पहाटे ६.४० ला अहमदाबाद पोहोचलो. मग आम्ही दोघं प्रतीक्षालयात गेलो आणि थोडा आराम केला. मी नाश्ता करून आलो तर राधाने(पत्नी) सांगीतले आज महाशिवरात्री आहे. मग मा‍झ्या डोक्यात प्रकाश पडला. मी सोमनाथाच्या दर्शनाची वेळ, पुढील गाडीची वेळ, हा सगळा हिशोब मांडला आणि बहुतेक माझा सगळा हिशोब चुकणार होता. माझी पुढील गाडी अहमदाबाद – सोमनाथ १०.४० ला सुटुन ८.०० ला तिथे पोहोचणार होती. मग मी विचार केला दर्शनाचा जुळून आलेला योगायोग हुकला. पण हार मानून चालणार नव्हते. मी हॉटेल मध्ये प्रवेश केल्या-केल्या मंदिराविषयी माहिती काढली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रात्रभर मंदिर चालू राहणार होते. मग काय आम्ही तयार होऊन दीड तासात मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिरामध्ये Light And Sound कार्यक्रम चालू होता. तो बाहेरूनच ५ मिनिटे पाहीला. नेहमी प्रमाणे वाट चुकत आणि मंदिर शोधत एकदाचा नवीन मंदिरात गेलो. तर तिथे ११ वाजता आरती सुरू झाली होती मग तो ही प्रसाद पदरात पाडून शेवटी सुख कारक असे महादेवाचे दर्शन झाले. दर्शनाला दीड तास लागला परंतु अनुभव मात्र अवर्णनीय होता. एकदम नवीन मंदिर बांधले आहे आणि त्यावर सणा निमित्त रोषणाई उठून दिसत होती. Light and Sound कार्यक्रमाचा अनुभव सुद्धा एकदम छान आणि ताजातवाना करून जातो. महाशिवरात्री निमित्त मंदिर उजळून निघाले होते. जुने मंदिर बाजूलाच आहे. मग जुन्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बहुतेक प्रवाश्याच्या जाण्या-येण्या मुळे हा परिसर गजबजला होता.

हे महादेवा…
तूच जन्म, तूच मृत्यु
तूच स्तब्धता, तूच संगीत 
तूच शक्ती, तूच भक्ती
सोमनाथा, तुला करितो वंदन

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती Read More »

कविता : कुटुंब आणि वाद

विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण व्यर्थजगतात माणसं

सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे सतत तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे

कविता : कुटुंब आणि वाद Read More »

जग जिंकु…

भ्रष्ट परंपरा ऊखडून
कष्ट सोसू हाडं झिजवून
अपमानाची झळ सोसून
जग जिंकू कष्टाचे दान देऊन

अपमानाचे विष रिचवून
जळी, स्थळी ध्येय साकारून
प्रयत्नांची आहुती टाकुन
जग जिंकू असीम हिम्मत दाखवून

जग जिंकु… Read More »