कविता: सखी

कविता: सखी
सखे तुझ्या मधाळ वाणीने न बोलणारा बोलू लागलो
तुझ्या साध्या बोलण्यावर सुद्धा खुदकन हसू लागलो
तुझ्या आनंदात मी आनंद शोधत प्रसन्न राहू लागलो
दु:खाचे काय घेऊन बसलीस वेडे तुझे दु:ख जगू लागलो
 
जुनी खपली काढू नको सुखाचा मुलामा चढवू लागलो
सुखी सह-जीवनाची स्वप्न मी आत्ता मस्त रंगवू लागलो
भूतकाळ असो किती ही कठोर तरी घर आता सजवू लागलो
तू कधी येशील जीवनात तीच वाट फक्त पाहू लागलो
 
येण्याने उजळेल आयुष्य, छोटे-छोटे प्रसंग खुलवू लागलो
एकत्र येण्यासाठी असतील आव्हाने त्या विरुद्ध लढू लागलो 
अडचणींना लढू साथीने, त्यासाठी पुन्हा तयारी करू लागलो 
सखी करू नको काळजी फक्त देवावर श्रद्धा ठेवू लागलो 
 
नवा श्वास नवा ध्यास आभाळा पर्यंत दृष्टी फेरु लागलो
तुझी साथ असेल तर प्रेमात परत बहरू लागलो
तू फक्त-फक्त हो म्हण, आनंदी पक्ष्या प्रमाणे उडू लागलो
देशील साथ? होकार दे, पुन्हा प्रेमाचे बंध विणू लागलो

कविता: सखी Read More »