कविता

कविता

कविता : जाणिवांच्या फटीतून…

जाणिवांच्या फटीतून अनपेक्षित आले
तो क्षण सुखाची झलक दाखवून गेले

आडोसा धरून सुख लपून बसले
शोधायला गेलो मात्र नाही गवसले

अपयशाच्या राखेत दुख निपचित पडले
नवीन प्रयत्नांना तेथूनच धुमारे फुटले

यश अपयशाचे लपंडावाचे खेळ खेळले
सुख दु:खाचे नाते मात्र नाही जुळले

दु:खाच्या वाळवंटात प्रयास थकले
तेथेच यशाचे काटेरी मार्ग दिसले

कविता : जाणिवांच्या फटीतून… Read More »

कविता : असते… नसते…

असते…..
खरं मनसोक्त मुक्तपणे जगायचे असते
सौख्य लाभलेले कधीच मोजायचे नसते
आपल्या विचाराची सांगड घालायची असते
दुसर्‍याच्या मनातील मात्र गूढ उमजत नसते
जीवनात वेळेवर ऍडजस्ट करायचे असते
प्रत्येक वेळेस परिस्थिती मात्र कठोर नसते
निवडीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असते
विचारात जास्त तडजोड करायची नसते
स्वआवड निवड अशीच जपायची असते
इतरांची आवड मात्र अव्हेरायची नसते

इतरांना आयुष्यात सामावून घ्यायचे असते
जीवनभर एकाच व्यक्तीसाठी झुरायचे नसते

अवघड निर्णय घ्यायला मात्र शिकायचे असते
आयुष्यात जबाबदारी येताच झटकायची नसते

कविता : असते… नसते… Read More »

कविता : संयम

क्षण-क्षण जुळवून मनावर जडतो संयम
क्षणभंगुर सुख उपभोगता नाव होते दुय्यम

संयम बिघडता वाजतील तीन तेरा
संयम धरून होतील सातचे अकरा

रागावर नियंत्रण घटता उडतो संयम
रागाचे दुसरे नाव नुकसान हाच नियम

संयम राखता सहज मिळतो विजय
संयम दुरावताच फक्त मिळतो पराजय

संयमाने वाढवायचा असतो मनाचा तोल
नाही तर भावनांच्या वावटळीत घाव होतो खोल

कविता : संयम Read More »

कविता : मागे पडलो…

मागे पडलो…
जीवनाच्या शर्यतीत माणुसकीने वागलो
माणसा सोबत जगण्यात मागे पडलो

नात्यांचा जु खांद्यावर घट्ट ओढून धरलो
प्रवासात वाहत गेलो मागे पडलो

सुसंवाद नसताना शब्द धरून बसलो
ऐक्याला वाळवी लागली मागे पडलो

संघर्षाच्या वेळेस तत्व धरून बसलो
लढाईत जिंकून सुद्धा मागे पडलो

आप्तेष्टांना मित्रांना आपले म्हणून राहिलो
अपयशात माणुसकी निसटली मागे पडलो

कविता : मागे पडलो… Read More »

कविता: वाईट भूतकाळ सोडून दे

जागलेल्या आठवांचे माप घेणे सोडुनी दे
भूतकाळाच्या चुकांची मोजदादच खोडुनी दे
मैफिलीची गोड गीते वाटती ना आळवावी
पाश प्रीतीचे चुकीचे जोडलेले तोडुनी दे

धाडलेली प्रेम पत्रे फोल गेली फाडुनी दे
गाळलेल्या आसवांचे व्याज आता फेडुनी दे
शोधलेले शिंपले मोती मला दावू नको तू
खर्चलेले नेटके क्षण आपले मज जोखुनी दे

सोसल्या कडवट क्षणांची याद आता टाकुनी दे
छेडलेले बासरीचे सूर आता मोजुनी दे
पोळल्या गेल्या जिवाला आस तू दावू नको रे
बरसलेले पावसाळी चांगले क्षण त्यागुनी दे

सांडलेल्या आठवांना फक्त आता वेचुनी दे
मोरपंखी भावनांचे निबर जाळे तोडुनी दे
भावनांशी खेळणारे फास तू फेकू नको ना
चाललेले खेळ सारे एकदाचे मोडुनी दे

कविता: वाईट भूतकाळ सोडून दे Read More »

हिंदी कविता : कामयाबी…

Hindi Poem Success

अब बता भी दो राज तुम्हारी कामयाबी काअब दोस्तो से क्या है छुपाना उलझने भी आपने ढेर सारी सही होगीक्या राज है उनका हल निकालना क्या आपने भी हारा हुआ खेल खेला हैक्या रहस्य है उनको भी हराना आखिर जिंदगी भी उस मोड पे गई होगीजहाँ से रास्ता मुश्किल था चुनना किसीं वक्त आंखो पर

हिंदी कविता : कामयाबी… Read More »

कविता : काही नाही

काही नाही

काही नाही ओंजळीत मा‍झ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण नाही मनात उत्साह नाही
चंद्र नाही सूर्य नाही आकाशात इंद्रधनुष्य नाही

कविता : काही नाही Read More »

कविता: बेलाची लाखोळ

वृत्त वनहरिणी (८+८+८+८=३२)

इच्छा होती बेलाची लाखोळ वहावी मना सारखी
करू आरती निळकंठाची नजर असू दे जरा पारखी
प्रवास नव्हता मुळीच सोपा कष्ट खूप अन खूप अडथळे
लाखोळीचे नियम कडक अन किती सोवळे वेगवेगळे
 
धार्मिकतेचे वलय श्रावणी सश्रध्द स्वागत करीत असते
पाण्याचा अभिषेक चालतो काकड्यास गर्दी ही असते
बेल वाहण्यासाठी असतो काळ चांगला पहाट वेळी
मुहूर्त गाठायास करावी धावपळीची रोजच खेळी

कविता: बेलाची लाखोळ Read More »

कविता: आठवणींच्या डोहामध्ये

घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
 
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा

कविता: आठवणींच्या डोहामध्ये Read More »