कविता

कविता

कविता: बिबट्याचे मनोगत

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

कविता: बिबट्याचे मनोगत Read More »

कविता: आज्जी माझी…

आज्जी माझी…   आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी… मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी… संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी… कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही

कविता: आज्जी माझी… Read More »

अभंग…

पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित ||सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तनी| निरंतर|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत|| अभंग   Views: 115

अभंग… Read More »

कविता / प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९

कविता: नतमस्तक    तुझ्या पादुकांचे दर्शन सुखकारी माऊली तुझ्या द्वारी नतमस्तक माऊलीचा गजर पडतो कानावरी माऊलीचा चरणी पुन्हा नतमस्तक माऊलीचा महिमा किती गोड होतो दुःखावर प्रहार क्षणभर माऊलीचे रूप, ज्ञान अजोड किती घेऊ, साठवू ओंजळभर   प्रकाशचित्र :   प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९  प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९  प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९ प्रकाशचित्र

कविता / प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९ Read More »

कविता: पुन्हा एकदा…

मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले

कविता: पुन्हा एकदा… Read More »

कविता : बालमित्रांची सुट्टी….

करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी करू थोडा खेळ, बसला आता मेळ करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ मावशी

कविता : बालमित्रांची सुट्टी…. Read More »