कविता : जिम जमलेच नाही

कधी पाऊस जोरात होता
कधी ट्रॅफिक जॅम झाले
कधी उन्हाचा चटका लागला
त्यामुळे जिम केलेच नाही

आज प्लंबर आला होता
उद्या कारपेंटर येणार आहे
काल आळस केला होता
जिम जाणे झालेच नाही

जेव्हा वेळ हतबल होते
केव्हा काळ समोर थांबतो
मुहूर्तावर जिम करणे अवघड
त्यामुळे जिम जमलेच नाही

कधी मूडच झाला नाही
कधी सूर सापडला नाही
न जाण्याची कारणे असंख्य
मला जिम गवसलेच नाही

नवीन कारणे शोधतो मी
जिम ट्रेनरला सांगण्या साठी
मी सलग जिम केली आहे
असे कधी घडलेच नाही

हरण्याचे लक्षण कारण देणे
मूळ मुद्दाला फाटे फोडणे
कधी उगाच जास्तीचे बोलणे
खर असे कधीच घडले नाही😄😜

gym

  Pic Courtesy:  Google

Views: 32

0 thoughts on “कविता : जिम जमलेच नाही”

  1. Your mode of telling the whole thing in this article is genuinely fastidious, all
    be capable of effortlessly know it, Thanks a lot.

Leave a Reply