टीप १ – या कवितेची “९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद २०२० – कविकट्टा” या काव्यमंचा साठी निवड होऊन दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी कविता वाचन झालेले आहे.
टीप २ – या कवितेची कुबेर फेसबुक समूहावरील काव्य स्पर्धेत निवड झाली आहे.
कविता: द्वेष कशाला…
मोठेपणाचा आव कशाला
मान मरातबाचा भाव कशाला
किड्या मुंगीचे जगणे आपले
माणुसकी वर घाव कशाला
अपमानास्पद फास कशाला
चांगल्या नात्याचा घास कशाला
दुसर्याची किंमत किती जोखायची
जास्ती असल्याचा त्रास कशाला
चांगल्या नात्याचा घास कशाला
दुसर्याची किंमत किती जोखायची
जास्ती असल्याचा त्रास कशाला
भावनांचा बाजार कशाला
माणुसकी वर जुगार कशाला
काळ वेळ खेळवतो सगळ्यांना
भविष्या साठी लाचार कशालासामान्याची पडझड कशाला
लौकिका साठी फडफड कशाला
वागण्यात सहज चुकतात माणसे
दुसर्यांच्या उणिवांची चिरफाड कशाला
माणुसकी वर जुगार कशाला
काळ वेळ खेळवतो सगळ्यांना
भविष्या साठी लाचार कशालासामान्याची पडझड कशाला
लौकिका साठी फडफड कशाला
वागण्यात सहज चुकतात माणसे
दुसर्यांच्या उणिवांची चिरफाड कशाला
“९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद २०२० – कविकट्टा” |
कुबेर फेसबुक – काव्य स्पर्धा पुरस्कार |
“९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ – कविकट्टा” कविता: निरोप
“९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदे – कविकट्टा” कविता : कुटुंब आणि वाद
Views: 106
आजच्या वास्तविक जगण्याच्या शैलीवर चित्रण केले आहात अप्रतिम
सुंदर
अतिसुंदर कविता! अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या सर्वात मोठ्या मंचासाठी कवितेची निवड झाल्याबद्दल अभिनंदन 👏
खुप खुप धन्यवाद @Ankush mamidwar, @r_for_right, @Amol Kokane!!!