अभंग – धाव
कठीण प्रसंगी देवा येरे धावूनघेईन वाहून तुझ्या ठाई||१||
दुःखाचा भार अति लोभाची धारसंकटांचा मार उच्चाटन करी||२||
स्वस्तुतीचा साज दुहीचा माजषडयंत्राची खाज घात करी||३||
गर्वावर प्रहार फेडी अहंकारकरावा उद्धार सत्वर||४||
देव माझा श्वास शिवावर विश्वासतारणार निश्वास देव माझा||५||
Views: 52
Writing is an art. Not easy to put expression in words. Great work!!!
@Ram Fadnavis, Thank you very much!!!