ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल

कविता
Friendship

जमवू मित्रांची मस्त मैफल
काढू प्रत्येकांची पिसे अस्सल
लावू मस्त गप्पा-टप्पाचा फड
कधी-कधी आठवणीं होतील जड

घेऊ महत्त्वाच्या विषयावर सल्ला
एकमेका करून मदत गाठू पल्ला
करू विचाराचे मंथन मांडू मत
पुढील भेटीसाठी देवू विचारांना खत

सोडू कधी सुख दु:खाची शिदोरी
येतील ते स्वर्गीय क्षण पुन्हा माघारी
घेऊ थोडा आयुष्यातून छोटासा ब्रेक
लुटू आनंद हीच जीवनाची खरी मेख

ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ७

कविता

सुहृदय..
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा लागतो
गतकाळाचा सूर्य आठवणीत बुडालेला असतो

निवडक चित्र चारोळी – भाग ७ Read More »

कविता : संयमाची परीक्षा

कविता

अति-आज्ञेत होते संयमाची कठोर परीक्षा
जशी नात्यात असते दुसर्‍या कडून अपेक्षा

संयमानेच संयमाला मोजायचे असते
दुसरे मोजमाप काही जमायचे नसते

उतरत्या काळात संयम सोडायचा नसतो
उगवत्या काळात संयम वाढवायचा असतो

कविता : संयमाची परीक्षा Read More »

कविता : गर्जूनी

कविता

येतील संकटे गर्दीत धावुनीकाळे ढग आले उन्मत्त होऊनीप्रश्नांचा झाला विचित्र गुंतापराभवास सर्व आले गर्जूनी ईश्वरावर सर्व भार सोडूनीधीर सोडू नको जातील विरुनीसंयमाची अति कठोर परीक्षाहोशील संकट मुक्त कर्म जोडुनी Views: 83

कविता : गर्जूनी Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ६

कविता

निवडक चित्र चारोळी – भाग ६ निवडक चित्र चारोळी  निवडक चित्र चारोळी – भाग २  निवडक चित्र चारोळी – भाग ३ निवडक चित्र चारोळी – भाग ४ निवडक चित्र चारोळी – भाग ५ चित्र चारोळी – १ चित्र चारोळी – २ चित्र चारोळी – ३ Views: 801

निवडक चित्र चारोळी – भाग ६ Read More »

कविता : रिकामं ताट

कविता

कविता : रिकामं ताट एक सुखानं पूर्ण भरलेलं ताट पाहिजे बस आयुष्यात फक्त प्रेमाचा पाट पाहिजे नसतील त्यात जिलेबी अन शाही मसाला तत्वाची कसोटी, आदर्शाचा त्रास कशाला कारल्या सोबत दोस्ती साठी मीठ पाहिजे दुःखा सोबत दोस्ती साठी सुख पाहिजे नसेल त्यात भाजी, भाकरी आणि रस्सा खाऊ अळणीच, जरी नसेल भरलेला खिस्सा नसेल ताटात विविध खाद्य

कविता : रिकामं ताट Read More »

कविता : मन जसे ओहळाच पाणी

कविता

मन जसे ओहळाच पाणी दंवबिंदू फुलावर पडल्या वाणी मिसळणे माझा गुणधर्म तृष्णा भागवणे पुण्यकर्म मी एकरूप निसर्गाशी इमान मात्र स्वःधर्माशी ना पाप पुण्याची भाषा निखळ प्रवाही हीच आशा रमतो स्वत:त, ना जगाची फिकीर घेतो साठवून दुखांना जसा फकीर माझ जगणे प्रवाही माझ रूप प्रवाही प्रवास अति दूरवर राहतो प्रवाही पुढे मी घेतो नदीचा आकार स्वः

कविता : मन जसे ओहळाच पाणी Read More »

कविता : हळवा कोपरा

कविता

हल्ली मनाचा कोपरा हळवाच असतो 
जाणून घेण्यास कोणी मोकळाच नसतो 

मनुष्याच्या जत्रेत आपण एकाकीच असतो 
गर्दीत माणसाच्या आपण एकटेच फिरतो

कविता : हळवा कोपरा Read More »