ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्ट
भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित लेखक श्री शिवाजी सावंत लिखित “छावा” या कादंबरीवर आधारित आहे. “छावा” चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरांनी केले आहे. संगीत ‘ए आर रहमान’ यांनी दिले आहे. ‘सौरभ गोस्वामी’ यांचे छायाचित्रण, कॉस्च्युम ‘शीतल शर्मा’, संवाद ‘ऋषी वीरमणी’ यांचे, चित्रपटाचे संपादन/एडिटिंग ‘मनीष प्रधान’ यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजाचा आकृतीबंध एका ३ तासाच्या चित्रपटात साकारणे शक्य नाही. महाराजाचा अनेक भाषा येत असत. शस्त्र आणि शास्त्र पारंगत होते. ‘बुध भूषण’, ‘नायकभेद’, ‘सातसतक’ आणि ‘नखशिखा’ अशी पुस्तके लिहिली आहे. “छावा” कादंबरीवर आधारित असल्याने फक्त बुऱ्हाणपूर स्वारी पासून पुढे असा घटनाक्रम दाखवला आहे. लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजाचे चरित्र मांडण्याचा केलेला धाडसी आणि तितकाच यशस्वी प्रयत्न आहे.