कथा – बंडखोर
आज सुमेधच्या घरी इडली आणि वडा हा नाष्टाचा बेत ठरला होता. सुमेध अप्पा सोबत घरी सकाळच्या नाष्टाची वाट बघत बसला होता. स्वयंपाक घरातील काम संपवून सुमेधची आई “सरिता” आणि पत्नी “मेघा” नाष्टा घेऊन आल्या. अप्पाचा दंडक होता की दररोज रात्री जेवण आणि सुट्टीच्या दिवशी सकाळचा नाष्टा एकत्रच केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाचे एकमेकांशी बोलणे आणि आठवड्या भरची चर्चा व्हायची. बोलता-बोलता सुमेधच्या ऑफिसचा विषय निघाला. काल सुमेधने ऑफिस व्यवस्थापनाशी विविध मुद्द्यावर विरोध प्रगट करण्यासाठी ईमेल पाठवला आहे. त्यानंतर मॅनेजमेंटच्या लोकांनी त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलवले आहे. सुमेधला त्याचे ऑफिस मधले मित्र सांगतात की उगाच नुसती उठाठेव आणि बंडखोरपणा करण्यात काही अर्थ नाही आणि सुमेधने मॅनेजमेंटच्या लोकांच्या विरोधात जाऊन काहीही साध्य होणार नाही. उलट त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागेल असे मित्रांनी असा सल्ला दिला.