आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी – जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण ‘मृत्युंजय’ वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. ‘मृत्युंजय’ शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण ‘मृत्युंजय’ वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे ‘मृत्युंजय’ मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. ‘मृत्युंजय’ वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.
मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. माझ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.
Views: 61
Like this:
Like Loading...
Related