मी सकाळी ५.३० वाजता झहिराबादला पोहोचलो. तिथे बस स्टॅन्ड वर २ माणसे मराठीत बोलत होती. तेलुगू परिसरात पहाटे-पहाटे अलभ्य लाभ. चौकशी केल्या नंतर ती मंडळी आमच्या भागातीलच होती. तेथून ते दोघे संगमेश्वर मंदिराला जाणार होतो.
संगमेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच कुटुंबासाठी कुलदैवत असल्या मुळे येथे भाविकाची वर्दळ असते. मंदिरात गरूड स्तंभ आहे. तिथे भाविक पाण्याच्या कुंडाची पुजा करतात. दिवसातून पहिल्यांदा कुंड पूर्ण उपसतात. कुंडाच्या एका कोपर्याच्या देवळीतून पाण्याचा स्रोत येतो. कुंडातील पूर्ण पाणी उपसतात. एका विशिष्ट देवळीत नेवैद्य ठेवतात जेथे महादेवाची छोटी पिंड आहे. नेवेद्य पाण्याच्या विरुद्ध दिशेला सोडून सुद्धा आतल्या बाजूस ओढला जातो.
मंदिरात बरीच मंडळी जावळ, विधी आणि दर्शनास आली होती.गावाचे नाव झारा संगम आहे. तिथे भाविक स्नान करून मंदिरात दर्शन घेतात. मंदिरा जवळ आर्य वैश्य समाजाची धर्मशाळा आहे. तिथे भाविकासाठी राहण्याची चांगली सोय होते. मंदिरात शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती आहे. गर्भग्रहा बाहेर पुरातन दगड ठेवला आहे. मनात ईच्छापूर्ती ठेवुन दोन्ही हाताच्या फक्त ३-३ बोटांनी उचलायचा असतो. अशी मान्यता आहे की तो दगड उचलला तर तुमची ईच्छा पूर्ण होण्यास भगवान शिव आशीर्वाद देतील. जुन्या काळी जेव्हा हॉटेल वगैरे नव्हती तेव्हा लोक तिथले स्थानिक लोकांची महादेवाला नेवेद्य साठी मदत घेत. कुलदैवत असल्या मुळे लोक घरातील कार्य साठी इथे येतातच. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांकडे वंशावळी सुद्धा भेटू शकतात. मंदिरात कोणाची स्नानाची कोणाची दर्शनाची कोणाची पुजे साठी धावपळ सुरू होती. मंदिरा समोर हॉटेल आणि पुजा साहित्य दुकानाची रांग आहे. उत्तर दरवाज्या समोर खेळण्याच्या दुकानाची ओळ आहे. मंदिरात भाविकासाठी राहण्याची सोय सुद्धा आहे.
नृसिंह मंदिर (बीदर)
तेथून आम्ही बीदरला नृसिंह मंदिराला भेट दिली. खुप जुने मंदिर आहे. भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी भगवान विष्णु नी चवथा नृसिंह अवतार घेतला होता. पुरातन काळात इथेच जला सुर नामक दैत्याचा वध नृसिंह अवतारात केला होता. वधा नंतर जलासुरचे पाण्यात रूपांतर झाले. भक्ताची अशी मान्यता आहे नृसिंह मूर्ती ही स्वयंभू आहे. मंदिरात जाण्यासाठी भुयार मार्गे पाण्यातून वाटचाल करावी लागते. दर्शनाला रु ५ तिकीट आहे. भुयार जवळपास ३०० मीटर लांब आहे. पाणी थोडे गढूळ आणि अशुद्ध आहे. पाण्यात उतरताना भीती वाटते पण दर्शन झाल्यावर थकवा जातो. गुहेच्या भिंती वर वाघुळाचे राज्य आहे. ४.० ते ४.५ फुट खोल पाणी होते. नृसिंहाची मूर्ती कोरलेली आहे. दुसर्या बाजूला महादेवाचे पिंड आहे.
मंदिर मणीचोला डोंगर रांगेत आहे. मंदिर बीदर पासून ४.८ किमी अंतरावर आहे. बाहेरची बाजूस पूजा साहित्य दुकाने थाटलेली आहेत. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. हे मंदिर बऱ्याच जणांचे कुलदैवत असल्या कारणाने इथे भाविकाची बरीच गर्दी असते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस कुंड आहे.
कसे जाल :
२. बीदर हैदराबाद पासुन १५० किमी अंतरावर आहे.
३. बीदर पुण्या पासुन ४४५ किमी अंतरावर आहे.
४. बीदर – झारा संगम (संगमेश्वर) अंतर ६० किमी आहे.
खालील फोटो google वरून घेतले आहेत. वेळ नसल्या मुळे फोटो काढले नाहीत.
Views: 73