समजा तुम्ही चित्रपट बघत आहात आणि एक सस्पेन्स युक्त धीरगंभीर असा संवाद चालू आहे. पण संवाद चालू असताना पार्श्वसंगीतच नसेल तर तुम्हाला जेवणात मीठच नाही असा अनुभव येईल. ते संवाद तुम्हाला कदाचित भारदस्त वाटणार नाहीत किंवा त्यातील पूर्ण मज्जाच जाईल. जर चित्रपट भोजनाची परिपूर्ण थाली असेल तर मुख्य पदार्थ कथा, भात संगीत आणि पार्श्वसंगीत मिठाचे काम करेल. त्यामुळे पार्श्वसंगीता शिवाय चित्रपटाला गोडीच नाही.
पार्श्वसंगीत मानवीय भाव भावना, संवेदना, मूल्य, विवशता, आनंद, दुख अचूक वेध घेते. समजा बाहुबलीची लढाई चालू आहे आणि त्यात पार्श्वसंगीत नसेल तर विचार करा बाहुबली चित्रपटाला एवढी प्रसिद्धी भेटली असती का? नक्कीच तुमचे उत्तर नाही असेच येईल. कारण या चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात अगदी योग्य आणि प्रभावी पार्श्वसंगीताचा वापर केला आहे. बाहुबलीचा विषय असेल तर मी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत आज ही ऐकतो. “WKKB” हे बॅकग्राऊंड स्कोर तर माझ्या अतिशय आवडीचे आहे. बाहुबली दोन्ही चित्रपट सर्व अर्थाने परिपूर्ण आणि भारतीय चित्रपट सृष्टि साठी मैलाचा दगड आहेत. “म. म. कीरवाणी” यांनी दोन्ही चित्रपटाचे मिळून पार्श्वसंगीताचे 10 OST Volume काढले आहेत. आणि चित्रपटात अतिशय चोख वापरले आहेत.
मला हॉलीवुड चित्रपटातील “डार्क नाइट” चित्रपटातील पार्श्वसंगीत कथेला आणि संवादाला एका प्रकारची तीव्र धार आणते आणि अतिशय पूरक आहे. बॅटमॅन किवा जोकर प्रत्येक वेळेस पडद्यावर येण्या अगोदर पार्श्वसंगीत हळुवार चालू होत आणि पुढे समेवर येऊन तीव्रता वाढवत जाते. त्या वेळेस ते संवाद, दृष्य, कथा आणि पात्र अगदी परिणामकारक होते. त्यामुळे हा चित्रपट माझा आवडता आहे. या चित्रपटाला “हॅन्स झिमर” (Hans Zimmer) यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात पार्श्वसंगीत द्वारे वेदना आणि अपराधीपणा थीम उत्कृष्ट पणे साकारली आहे. त्यामुळे “हॅन्स झिमर” माझ्या आवडता पार्श्व संगीतकार आहे. चित्रपटाची सुरुवातच बँक लुटण्या पासून सुरू होते. पहिल्याच फ्रेम पासून संगीत तुमच्या थेट हृदयात उतरत जाते हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नायक, खलनायक यांच्या धडाकेबाज प्रवेशाला आणि समोरा-समोर येताना जबरदस्त संगीताचा उपयोग केला आहे.
चित्रपटाची थीम/ विषय पार्श्वसंगीत द्वारे ठळक दृष्ट्या मांडला जातो. चित्रपटात अॅक्शन/ थरारक /रहस्यमय असेल तर त्याचे पार्श्वसंगीत उत्कंठा वर्धक आणि प्रेमकथा असेल त्याचे पार्श्वसंगीत नि:संशयपणे हळुवार, कोमल आणि नाजुक असेल. तमिळ चित्रपट “विक्रम वेधा” पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाला साजेसे, गंभीर, आणि रहस्यमयी आहे. पार्श्वसंगीत मोक्याच्या क्षणी उत्कंठा वर्धक आहे. नायक आणि खलनायक या दोघांच्या भूमिका संगीताद्वारे उत्तम रित्या दाखवल्या आहेत. “Scam 1992: The Harshad Mehta Story” या वेब सिरिज मध्ये पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. प्रतीक गांधी ज्या-ज्या वेळेस संवाद करतो त्या-त्या वेळेस संगीताचा अतिशय समर्पक वापर केला आहे. पार्श्वसंगीत आणि जुन्या काही गाण्याचा योग्य वेळी योग्य वापर केला आहे. त्यामुळे प्रतिकच्या वाक्यांना वेगळीच धार येते. या वेब सिरिज मधील “थीम सॉन्ग” असेच अफलातून आहे. हॉलीवुडपट “300”/ “300: Rise of the kingdom” या चित्रपटाचे पार्श्वसंगीत सुद्धा नावाजलेले आहे. या दोन्ही चित्रपटात लढाईच्या दृश्यांना काय अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे. लढाईचतील तो युद्ध ज्वर, युद्धा सुरू होण्या अगोदरची दमदार आरोळी, जिंकण्याचा साज, पराभवाच दु:ख आणि एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी जोरदार भाषण हे सगळे उत्तम रित्या पार्श्वसंगीत द्वारे उभारले आहे.
पार्श्वसंगीताचा विषय निघालाच आहे तर “KGF Chapter 1” चे नाव तर काढावेच लागेल. “रॉकी भाय” च्या प्रत्येक संवादा वर आणि प्रवेश वर पार्श्वसंगीताचा सुरेख वापर केला आहे. प्रत्येक पात्राला विशिष्ट असे पार्श्वसंगीत आहे. “mother lullaby”(अंगाईगीत) काय भारदस्त आहे. काय नाही त्या बॅकग्राऊंड स्कोर मध्ये? आईची ममता, काळजी, प्रेम आणि सर्व काही. क्लायमॅक्स सीन मधील “Nuclear Siren” BGM काय तूफान आहे. या चित्रपटातील हा BGM चालू होताच आत्ता पुढे काही तरी मोठे होणार आहे याची चाहूल लागते. तसेच “KGF Chapter 2” मध्ये सुद्धा “रवी बसरूर” यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत आहे हे टीझर वरूनच लक्षात येते. “रवी बसरूर” आणि “म. म. कीरवाणी” हे दोघं ही माझे आवडते पार्श्वसंगीतकार आहेत.
चला तर मग सांगा तुम्हाला कोणत्या चित्रपटाचे/वेब सिरिजचे पार्श्वसंगीत आवडते आणि का? त्यात जर आवडता पार्श्वसंगीतकार असेल तर सोन्याहून पिवळे. तर लवकरात लवकर कळवा.
OST – Original Sound track
BGM – Background Music
Views: 167
Theory of Everything by Johann Johannsson
Thanks @Amod !!! I will go through that track!!!