कविता : ध्यास

अवचित भेट…
चित्त सैरभैर…
जाणीवां थेट….
भाव सैरवैर…
आस सोबतीची…
ग्लानी मनाची…
मैत्री विचाराची…
भाषा प्रेमाची…

पडझड कुटुंबाची…
घुसमट आत्माची…
धडपड नात्याची
फरफट जीवाची

बुद्धिबळाचा डाव…
खोलवर घाव…
काळाचा घाला..
प्रारब्ध झेला…

गृहीतकाचा तिढा…
कार्याची दखल…
समस्येचा वेढा…
प्रश्नाची उकल…

ध्यास नवा…
संघर्ष हवा…
इच्छेचा प्रकाश…
मोकळे आकाश…

Views: 42

Leave a Reply

Translate »