हे महादेवा…

तूच जन्म, तूच मृत्यु
तूच नृत्य, तूच गीत
तूच शक्ती, तूच भक्ती
हे शिवा… आजन्म तुझा भक्त राहीन मी
 
तूच निश्चल, तूच संगीत
तूच सापेक्ष, तूच निष्पक्ष
तूच कठोर, तूच कृपाळू
हे भैरवा… आजन्म तुझेच संगीत गाईन मी
 
तूच प्राकृतिक, तूच विध्वंसक
तूच वीरभद्र, तूच भोलानाथ
तूच कलात्मक, तूच कालांतक
हे महादेवा… आजन्म तुझे पूजन करीन मी
 
तूच आभाळभर, तूच धरित्रीधर
तूच आनंदघन, तूच विषयपूर्ण
तूच चिरतरूण, तूच नवनिर्माण
हे अमरनाथा… आजन्म तुझी अर्चना करीन मी

तूच सर्वांग सुंदर, तूच अक्राळ-विक्राळ
तूच अथांग सागर, तूच निर्वात पोकळी
तूच महा मृत्युंजय, तूच प्राण संहारक
हे महाकालेश्वर… आजन्म तुझीच साधना करीन मी

Views: 82

1 thought on “हे महादेवा…”

  1. Pingback: अद्वितीय अनुभव... - महेश मंदिर यात्रा २०१७ - शिरूर ताजबंद

Leave a Reply

Translate »