कविता : वासना

ही कसली सभ्यता ही कसली वासना
का होतात सारख्या-सारख्या निंद्य घटना

का होतो अन्याय का होतो अत्याचार
आणि किती निरागस पाकळ्या खूडणार?

का समजतात तिला फक्त भोगाचे शरीर
संपेल का वासनेच्या भुकेची विखारी किनार?

घाणेरडा स्पर्श अन हरपलेली संवेदना
कधी कमी होतील का अश्या दुर्घटना?

बरबटलेल्या जाणि‍वा अन भुकेलेल्या नजरा
कोण देणार दुष्टचक्र संपल्याचा दुजोरा?

कठूवा प्रकरणाचा निषेध!!!

Views: 45

Leave a Reply

Translate »