कविता : रिकामं ताट

एक सुखानं पूर्ण भरलेलं ताट पाहिजे
बस आयुष्यात फक्त प्रेमाचा पाट पाहिजे

नसतील त्यात जिलेबी अन शाही मसाला
तत्वाची कसोटी, आदर्शाचा त्रास कशाला

कारल्या सोबत दोस्ती साठी मीठ पाहिजे
दुःखा सोबत दोस्ती साठी सुख पाहिजे

नसेल त्यात भाजी, भाकरी आणि रस्सा
खाऊ अळणीच, जरी नसेल भरलेला खिस्सा

नसेल ताटात विविध खाद्य पदार्थांची फौज
तरी होईल मित्र आप्तेष्टांची खास मौज

उपवास, अजीर्ण, अपचन जीवनाचा भाग
आयुष्यात प्रत्येक परिस्थितीतुन काढू माग

कधी पंच पक्वान्न कधी पूर्ण उपासमार
परिस्थिती अवघड, हार नाही मानणार

Visits: 63

2 thoughts on “कविता : रिकामं ताट”

Leave a Reply