mother, daughter, sunset-429158.jpg

कविता: आई म्हणजे आईच असते

कविता: आई म्हणजे आईच असते

आई म्हणजे आई म्हणजे आईच असते
अहो असे काय करता तुमची आमची सारखीच असते

तुमचे भले करण्यात तिचा आनंद असतो
लेकरांना कमी पडू नये हाच बाणा असतो

कठीण प्रसंगी वीजे सारखी तळपत असते
कसोटीच्या काळात नदी सारखी शांत, प्रवाही असते
 
कडक उन्हाळ्यात सुद्धा मायेची सावली असते
नात्याच्या भवऱ्यात वाचण्याचा शेवटचा उपाय असते
 
दोलायमान परिस्थितीत मार्ग दाखवणारा गुरु असते
झोपून जरी असली तरी कुटुंबाचा एकसंध कणा असते
 
पडझडीच्या काळात बाळासाठी तर प्रयत्नांची ढाल असते
तुमच्या जटील समस्येचे उत्तर शोधण्यात हुशार असते
 
सगळे विरोधात असताना तिथे जगाशी लढत असते
स्व: बाजूला ठेवून पालकत्व साजरे करत असते
 
तुम्हाला तुमच्या पेक्ष्या जास्त ती ओळखून असते
परिस्थितीचे ऊन झेलत मुलासाठी वडाचे झाड असते
 
कितीही लिहिले तरी आईसाठी खूप कमीच असते
अहो असे काय करता तुमची आमची सारखीच असते
 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Views: 102

Leave a Reply