लघुकथा – निरोप समारंभ
पार्टी संपल्यानंतर मंगेश आणि तुषार बोलत थांबले. त्या दोघांचे घर एकाच भागात होते त्यामुळे तुषारला मंगेश गाडीत त्याच्या घरी सोडणार होता. तुषार म्हणाला मंगेश तू आलास मला खूपच आनंद झाला.
“अरे तुझा ऑफिस मधील शेवटचा दिवस आणि मी नाही येणार असे होईल का”
“असे तुला वाटत असेल तर असे काही नाही. तुलाही माहीत आहे मला छुपे वार करणाऱ्या मित्रा पेक्षा समोरून वार करणारा विरोधी आवडतो.”
मित्रा तुला भविष्या साठी खूप-खूप शुभेच्छा!!!
असे म्हणून मंगेशने कार सुरू केली. आणि त्यांना त्यांचे मागील दिवस आठवले.
पण जेव्हा तुषार त्याच्या टिम मध्ये आला त्यामुळे तेथील वातावरण बदलले. सुरवातीला दोघांत मैत्रीपूर्ण व खेळीमेळीचे वातावरण होते. पण जसा- जसा त्यांच्या दोघांतील फरक स्पष्ट होत गेला तसे दोघांत ताण तणाव निर्माण झाले. एखादी समस्या तुषार आणि मंगेश त्यांच्या विचारसरणी नुसार दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवायचे. त्यात मग दोघ आपले विचार हिरीरीने मांडायचे आणि दुसर्यांना पटवून द्यायचे की आपलीच समस्या सोडण्याची पद्धत कशी बरोबर आहे. यात कोणाचे जास्त बरोबर यावर वादा वादी व्हायची.
कार मध्ये बसल्यावर तुषार ने सांगीतले. तुला ते टिम प्रकरण लक्षात असेल. त्यात आपला खूप वाद झाला होता आणि आपल्यात भांडणाची ठिणगी पडली होती आणि आपण एकमेकाचे अघोषित शत्रू झालो होतो.
हो त्या वेळी एका महत्त्वाच्या कामातून मंगेशला काढून टाकण्यात आले. मंगेशला वाटले की तुषारच्या सांगण्यावरून त्याला काढण्यात आले आहे. त्याने हे आरोप तुषार वर लावले. पण तुषारने आरोप सरासर अमान्य केले. त्यामुळे आपल्या मधील संवाद खुंटला होता. त्या प्रकरणात तू माझ्यामुळे नाही तर आपल्या मॅनेजर सौरभ मुळे आपल्यात फुट पडली होती. सौरभने आपल्यात जाणीव पूर्वक दरी निर्माण केली कारण आपण जरी भांडत असलो आणि आपल्या समस्या सोडवायच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही पद्धती खूपच चांगल्या होत्या आणि आपण एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी त्या आपण जास्त अभ्यास करून व्यवस्थित रित्या सादर करायचो. त्यामुळे सौरभच्या विचाराकडे सगळ्यांचे दुर्लक्ष व्हायचे. आणि सौरभला असे वाटायचे की त्याची टिम वरील पकडीला तडे जातात की काय. ही भीती त्याला ग्रासली होती त्यामुळे त्याने आपल्यात फुट पडली आणि आपल्यात भांडण लावल्या मुळे आपण दुरावलो आणि त्याचा फायदा मात्र सौरभला झाला. त्याची टिम वरील पकड मजबूत झाली.
तुषार तुला माहिती आहे, माझ्या उणीवा भरून काढण्यात मला तुझी खरच मदत झाली. मला माहीत आहे. लोकांशी संपर्क साधण्याची कला आणि आपला मुद्दा व्यवस्थित मांडण्याची कला वाढण्यास मला तुझी खरच मदत झाली. कारण मी आधी पासून बूजरा आणि आत्मकेंद्रित होतो. पण जो पर्यंत तुमच्या मतांना आव्हान देणारे कोणी देत नाही तो पर्यंत तुमच्या मतांची परीक्षा झालेली नसते. त्यामुळे माझ्या विचारात आणि कृतीत फरक पडायचा पण तुला हरवायच्या नादात मी या दोन गोष्टीवर मात केली कारण तुझ्या रुपात माझ्या समोर आव्हान देणारे कोणी तरी आले होते. ज्याकडे स्वत:ची अशी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघायची दृष्टी होती. आणि तुला आव्हान देण्यासाठी मी माझ्यात सुद्धा भरपूर सकारात्मक बदल घडवून आणले.
मंगेशला जाणवले की तुषारचे घर जवळ येत आहे. मंगेश म्हणाला की मित्रा आपण दोस्त झालो, चढाओढ केली, भांडलो आणि मैत्री सुद्धा तोडली पण तिरस्कार केला नाही. त्यामुळे तुझ्या या निरोप समारंभाच्या पार्टीत मी आपली मैत्री कायम राहावी हीच सदिच्छा घेऊन आलोय. या व्यतिरिक्त माझा काहीही उद्देश नव्हता. आणि तुषार तू माझा कायमच चांगला मित्र राहशील याची मी ग्वाही देतो आणि निघतो. तुषार मंगेश कडे बघून एक स्मितहास्य केले आणि तो घरी जाण्यास वळला.
डिसक्लेमर: ही कथा लेखकाची कलाकृती असून काल्पनिक आहे. कथेचा कोणत्याही व्यक्तीशी, जागेशी, संस्थेशी संबंध नाही.
Views: 77
I like your post! I checked out your website pretty often, and you are continuously coming up with some decent
staff. I shared this post on my Twitter, and my followers liked it!
To the next. Cheers.
Good writeup! I shared your website on my Tumblr.
Hope my friends are going to enjoy your articles as well. To the next.
Cheers.