शतशब्द कथा – विरोधक…
अनुप आणि मानसी एकाच कॉलेज आणि एकाच वर्गामध्ये शिकत असत. पण दोघा मध्ये चढाओढ आणि खुन्नस फार पूर्वी पासून होती. दररोज कॉलेज मध्ये लवकर कोण पोहोचतो यांची सुद्धा दोघात चढाओढ असे. कॉलेज मध्ये सांघिक खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात, अभ्यासात दोघा मध्ये एक नंबर मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असे.
कॉलेज संपल्या नंतर अनुप उच्च शिक्षणासाठी शहरात गेला. आणि मानसीला आपला प्रमुख विरोधक गेल्या मुळे खूप एकटे वाटत होत. अनूपला कसे हरवता येईल? हाच विचार तिच्या मनात घर करून होता. तिला कळत नव्हते की तिला आता अनूपची आठवण का येत होती. ज्यावेळेस अनुप शिक्षण संपून गावी परतला त्याचवेळेस तिने तिच्या मनातील गोष्ट त्याला सांगितली. आणि चक्क अनूपने होकार दिला.
Views: 67