मी माझ्या (SAS R&D Ltd Pune)ऑफिसच्या ऑफसाईटच्या निमित्ताने गोव्याला गेलो होतो. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. १० तारखेला गुरूवारी दुपारी 4.30 ला आम्ही रेल्वेने निघालो आणि 11 तारखेला 8.30 वाजता पोहोचलो. सकाळी एका हॉटेल मध्ये पोहे खाल्ले. पुण्या पेक्षा चवीला उत्कृष्ट पोहे गोव्यात खाल्याने सुखद अनुभव दिला. (फॉरचून अक्रॉन रेजिना) हॉटेल रूम भेटायला वेळ असल्याने आम्ही पटापट अॅक्टिवा भाड्याने घेतल्या आणि तडक उत्तर गोव्यातील (Vegator Beach) वेगटोर बीच कडे कूच केले. छोटे रस्ते, प्रदूषण मुक्त हवा, आजूबाजूला हिरवीगार शेती, आमच्या कडे बघून प्रसन्न पणे हसणारा सूर्य आणि कमी वर्दळ यामुळे अॅक्टिवाचा प्रवास सुखद होता. सकाळची वेळ, कमी उकाडा आणि शांत रस्ता त्यामुळे एका तासांतच आम्ही तिथे पोहोचलो. बीचच्या बाजूला चपोरा किल्ल्याचे(Chapora Fort) आधी दर्शन घेतले. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. त्यात एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला हिरवीगार झाडी. पण महाराष्ट्राच्या किल्ल्या एवढी भव्यता तिथे जाणवली नाही. किल्ला चढताना मात्र माझी दमछाक झाली. प्रवासात उलटी सदृश्य मळमळ झाल्यामुळे गटागट नारळाचे पाणी पिले आणि पाण्याची एक बाटली भरून घेतली. मी प्रवासात डिहायड्रेट (dehydrate) होणार नाही याची काळजी घेतो. फोटोग्राफी साठी एक अतिशय उत्तम जागा आहे. उंचा वर असल्यामुळे चारही दिशेचे फोटो काढायला सुखद अनुभव होता. किल्ला उतरल्या नंतर आम्ही वेगटोर बीचला गेलो. सुंदर आणि शांत बीच होता. दुपारची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. जीन्स असल्याने मी काही जास्त पाण्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. तेथून आम्ही लंच साठी २.३० ला हॉटेलला पोहोचलो. लंच करून आराम केला आणि सूर्यास्त बघायचे ठरवले. सूर्यास्तासाठी बीचवर पोहोचायला उशीर झाला. पण सूर्यास्त एन्जॉय करून परत ऑफिस पार्टी मध्ये एन्जॉय केला. बाघा बीच बघून अश्या रीतीने गाणी गुणगुणत पहिला दिवस संपला.