आजींची खोली

ना भावनेचा हुंकार, ना श्वसनाचा अंहकार
ना शब्दाचे उच्चार, ना इच्छेचा आविष्कार

खोली सुनसान, अडगळीचे सामान
कोपर्‍यात छायाचित्र, मुक्तीचे साधन

श्वास अडकला होता, कोंडले होते क्षण
तुटले होते व्यासपीठ, सांडले सोन्याचे कण

आजींची खोली Read More »