भाऊबंध

दिवाकर आणि नरेश हे दोन चुलतभाऊ एका निसर्गरम्य गावात वाढली. गाव तस लहान…एका बाजूने वाहत जाणारी नदी… दुसर्‍या बाजूला डोंगर… चारही दिशेला असलेली खेडी… जवळच असलेले २ तलाव… मेन रोडमुळे वाहनाची वर्दळ… आणि मधोमध मंदिर…

त्यांची घरे एकमेकांच्या बाजूस होते. तसे तर एकमेकांची ओळख सांगताना ते फक्त हा माझा भाऊ आहे अशी करून देत. चुलत वा सख्खे भाऊ असे मनात सुध्दा येत नसे. ते बालपणाचे सुरेख दिवस होते. सगळी भावंड मिळून खेळत, अभ्यास करत व दंगा-मस्ती करून मस्त पैकी एकत्र जेवण करत असत. दोघा मधला ‘बॉन्ड’ खुपच छान होता. त्यांच्या सोबत अजूनही भावंडे होती पण दोघं मिळून खुप धिंगाणा, गोंधळ करत. पूर्ण गाव भर फिरून येताना खुपच मजा येत असे.

भाऊबंध Read More »