चित्रपट परीक्षण/रिव्यू – “सुपर ३०” – एक हुकलेला षटकार
हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे “शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई”. पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे. एक गरीब विद्वान गणितज्ञाला शिक्षणा साठी पैसे न मिळाल्यामुळे जीवनाच्या संघर्षा साठी सायकल वर फिरून ५ रुपयाचे पापड विकावे लागते हे बघून हृदय पिळवटते. चित्रपटाचा पहिला भाग उत्तम रित्या साकारण्यात आला आहे.
कास्टिंग दिग्दर्शकची कमाल आहे. हृतिक रोशनला मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे. कुठे धूम, आणि bang bang चा निळ्या डोळ्याचा स्टाईलिश हिरो आणि कुठे शिक्षणासाठी संघर्ष करणारा, आणि परिस्थिती ने गांजलेला नायक… हृतिकने ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. त्याच्या अभिनयातून, देह बोलीतून, डोळ्यातून, आणि बोलण्यातून “आनंद कुमार” सुंदर रित्या उलगडला आहे. चित्रपटाचा पहिल्या फ्रेम पासून हृतिक आपल्याला हृतिक न वाटता गणितज्ञ “आनंद कुमार”च वाटतो. उत्तम संवाद आणि संयमित अभिनय यामुळे हृतिक उठून दिसतो. गणितज्ञ “आनंद कुमार” यांना केंब्रीज इथे शिक्षणा साठी संधी मिळते ते ३० गरीब विद्यार्थीना घेऊन IIT च्या तयारीसाठी “सूपर ३०” चा संघर्ष मय स्थापना करणारा आनंद उत्तम रंगवला आहे. आनंदला आनंद साजरा करतानाचे दृष्य पाहण्या लायक झाले आहे. जेव्हा आनंद कुमारच्या स्वप्नांना परिस्थितीने विराम लागतो त्यानंतर आनंद कुमार दुप्पट मेहनतीच्या जोरावर दुसर्यांच्या स्वप्नांना बळ देतो. हाच महत्वाचा संदेश चित्रपटात देण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाला संगीतकार अजय-अतुल याचं संगीत लाभलेले आहे. पार्श्वसंगीतावर सैराटचा प्रभाव टळक जाणवतो. पाच गीत आहेत पण विशेष असे एकही गीत लक्षात राहत नाही. त्यातल्या त्यात “जुगर्फिया” हे गाणे चांगले झाले आहेत. छायाचित्रण, चित्रपट संपादन, कॉस्टयूम डिझाइन, इतर विभागाने आपले काम चोख रित्या पार पाडले आहे.
हृतिकचा चांगला अभिनय, चांगली कथा, सर्वसाधारण पटकथा, सहायक अभिनेते आणि अभिनेत्रीने केलेले उत्तम काम, एका खऱ्या घटनेला एका प्रेरणादायी चित्रपटात रुपांतरीत करायचा चांगला प्रयत्न… काही वेळा अचंबित करणारा आणि काही वेळा साधारण वाटणारा… एक हुकलेला षटकार… पण तुम्हाला संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देणारा चित्रपट एकदा आवर्जून पाहण्या सारखा नक्कीच आहे. हा चित्रपटाला कमीत कमी अडीच स्टार द्यायलाच हवेत…
Views: 81
Ekdam Super lihilay
@abhishek धन्यवाद!!!
Good one
धन्यवाद!!!
Great analysis
Thanks!!!
एकसंध प्रभाव तयार होत नाही हे अगदी खर आहे त्यामुळे काहितरी राहील आहे असा वाटत.
प्रतिसादा साठी धन्यवाद!!!