आज्जी माझी…
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी…
मायेची पाखर, उडून गेली दूरवर
परी आठवण नाही पुसली कदापि
आज्जी माझी…
संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले
भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले
आज्जी माझी…
कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले,
डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले,
प्रयत्नांत कधी धडपडले, घडले
परी मी किंचित नाही घाबरले
आज्जी माझी…
आप्तांना भेटण्यास जीव कासावीस
दिसताच पाणावले डोळे आठवणीने
आज्जी माझी…
आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले
इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती
आज्जी माझी…
पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले
वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल
आज्जी माझी…
Views: 108