मी माझ्या (SAS R&D Ltd Pune)ऑफिसच्या ऑफसाईटच्या निमित्ताने गोव्याला गेलो होतो. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. १० तारखेला गुरूवारी दुपारी 4.30 ला आम्ही रेल्वेने निघालो आणि 11 तारखेला 8.30 वाजता पोहोचलो. सकाळी एका हॉटेल मध्ये पोहे खाल्ले. पुण्या पेक्षा चवीला उत्कृष्ट पोहे गोव्यात खाल्याने सुखद अनुभव दिला. (फॉरचून अक्रॉन रेजिना) हॉटेल रूम भेटायला वेळ असल्याने आम्ही पटापट अॅक्टिवा भाड्याने घेतल्या आणि तडक उत्तर गोव्यातील (Vegator Beach) वेगटोर बीच कडे कूच केले. छोटे रस्ते, प्रदूषण मुक्त हवा, आजूबाजूला हिरवीगार शेती, आमच्या कडे बघून प्रसन्न पणे हसणारा सूर्य आणि कमी वर्दळ यामुळे अॅक्टिवाचा प्रवास सुखद होता. सकाळची वेळ, कमी उकाडा आणि शांत रस्ता त्यामुळे एका तासांतच आम्ही तिथे पोहोचलो. बीचच्या बाजूला चपोरा किल्ल्याचे(Chapora Fort) आधी दर्शन घेतले. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. त्यात एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला हिरवीगार झाडी. पण महाराष्ट्राच्या किल्ल्या एवढी भव्यता तिथे जाणवली नाही. किल्ला चढताना मात्र माझी दमछाक झाली. प्रवासात उलटी सदृश्य मळमळ झाल्यामुळे गटागट नारळाचे पाणी पिले आणि पाण्याची एक बाटली भरून घेतली. मी प्रवासात डिहायड्रेट (dehydrate) होणार नाही याची काळजी घेतो. फोटोग्राफी साठी एक अतिशय उत्तम जागा आहे. उंचा वर असल्यामुळे चारही दिशेचे फोटो काढायला सुखद अनुभव होता. किल्ला उतरल्या नंतर आम्ही वेगटोर बीचला गेलो. सुंदर आणि शांत बीच होता. दुपारची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. जीन्स असल्याने मी काही जास्त पाण्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. तेथून आम्ही लंच साठी २.३० ला हॉटेलला पोहोचलो. लंच करून आराम केला आणि सूर्यास्त बघायचे ठरवले. सूर्यास्तासाठी बीचवर पोहोचायला उशीर झाला. पण सूर्यास्त एन्जॉय करून परत ऑफिस पार्टी मध्ये एन्जॉय केला. बाघा बीच बघून अश्या रीतीने गाणी गुणगुणत पहिला दिवस संपला.
फोटो – वेगाटोर बीच |
फोटो – चापोरा किल्ला |
फोटो – चापोरा किल्ला |
फोटो – bridge |
फोटो – वेगाटोर बीच |
शनिवारी सकाळी आम्ही 9.00 वाजता नाश्ता करून सुरुवात केली. सर्वसाधारण दिवस होता. गोव्याचा तोच उकाडा आणि तेच झगमगाटी वातावरण होते. आम्ही मोर्जीम बीच कडे कूच केली. शांत समुद्र, सकाळची वेळ असल्याने कमी गर्दी आणि नितळ, सुंदर आणि स्वच्छ पाणी त्यामुळे आम्ही त्या बीचच्या प्रेमातच पडलो. बीच वर खडक नव्हता आणि तिथे आम्ही मनसोक्त समुद्र विहार केला. समुद्राच्या लाटेत आम्ही तरंगायचा प्रयत्न केला पण मला पोहता येत नसल्याने मी लाटांवर स्वार होण्या ऐवजी फेकला जात होतो. पण त्यात सुद्धा एक वेगळीच अनुभूति होती. बीच वर एका विशिष्ट ठिकाणी मोठी लाट येऊन किनार्याला धडकत होती आणि तीच लाट किनार्याला धडकून परत येत होती. त्यामुळे बीच वर लाटां मुळे मागे पुढे फेकला जात होतो. निसर्गात तुम्ही एकरूप झालात की निसर्ग तुम्हाला त्याचाच एक भाग बनवतो. तेथून दुसर्या बीच वर जाऊच वाटत नव्हते. समुद्र स्नानाचा मनसोक्त अनुभव घेतला. तोच आनंद लुटून आम्ही तेथून प्रयाण केलं. आत्ता पोटात कावळे ओरडायला लागले होते. कौशलेंद्रने(मित्र) नवीन ठिकाण सुचवले “अल्कोव्ह बीच रिसॉर्ट”(Alcove Beach Resort) येथील उपहारगृह. ते ठिकाण आम्ही पहिल्या दिवशी जाऊन आलेल्या ठिकाणा जवळच होते. आणि आत्ता आम्हाला मेन रोड सोडून थोडे आत जावे लागले असते. तरीही आम्ही आमची अॅक्टिवा GPS नुसार अल्कोव्ह कडे वळवली.
उपहारगृह अतिशय सुंदर ठिकाणी होते. टेकडीवर रिसॉर्ट वसलेलं होत. माथ्यावर रिसॉर्टची मुख्य इमारत, मध्ये स्विमिंग पूल आणि त्यापुढे रेस्टॉरंटची अतिशय उत्कृष्ट जागा होती. टेकडीवर आजूबाजूला वेगवेगळ्या उंची वर रिसॉर्ट परिसरात बंगलो पसरलेले होते. आजूबाजूला नारळाची उंच झाडं. रेस्टॉरंट पुढे बीच आणि अथांग समुद्र. एक ठिकाणी शांत बसून, संगीताचा आस्वाद घेत, विविध खाण्याचे पदार्थ फस्त करत सूर्योदय आणि सूर्यास्त पाहताना तुम्हाला अतिशय आनंद झाला असता. आम्हाला पूर्ण परिसर बघायला 5 मिनिटे लागले. आईच्या हातचे खाल्ले की अर्धी चपाती जास्त जाते तसे उत्कृष्ट, आणि सुंदर नवीन जागेवर भोजन थोडे जास्त जाते. आम्ही ऑर्डर दिली आणि वेटर सुद्धा आरामात डिशेस आणत होता. स्टार्टर साठीच त्याने बराच वेळ लावला. आम्हाला निवांत भोजन करायचे असल्याने काही गडबड दाखवली नाही त्यामुळे बहुधा त्याला सुद्धा कळले असेल निसर्गाचा आस्वाद आणि डिशेसची स्वाद घेण्यासाठी मंडळी आली आहेत. त्यात आम्ही तेथील रेस्टॉरंटची स्पेशल डिश “व्हेज कॅल्डीन” निवडली आणि ती डिश खुप चांगली लागली. त्यात काही वेळ आम्ही फोटो काढण्यात खर्च केला आणि काही गप्पा आणि चर्चा करण्यासाठी खर्च केला. गप्पांचा विषय जुन्या गाण्या पासून ते डेस्पॅसिटो गाण्या पर्यंत पोहोचला. निलेश(मित्र) आणि कौशलेंद्रची मस्ती चालूच होती. एका प्रकारे गप्पा, रेस्टॉरंटचा स्थान, बीच, नारळाची झाडं आणि निळा अनंत पसरलेला समुद्र, विविध डिशेसचा आस्वाद आणि चर्चा यामुळे एक वेगळाच माहोल जमून आला होता.
फोटो – अल्कोव्ह बीच रिसॉर्ट |
फोटो -अल्कोव्ह बीच रिसॉर्ट |
फोटो -अल्कोव्ह बीच रिसॉर्ट |
फोटो -अल्कोव्ह बीच रिसॉर्ट |
फोटो – डीश – व्हेज क्रिस्पी |
फोटो – डीश – स्टार्टर |
फोटो – डीश – व्हेज कॅल्डीन |
फोटो – मिनी वेगाटोर बीच |
आणि आम्ही तेथून परत हॉटेल कडे प्रयाण केले. पण रहदारी मुळे वेळ लागत होता. आम्ही निर्णय घेतला की हॉटेलला जाऊन सूर्यास्तासाठी जाण्या पेक्षा कॅन्डोलिम बीच वर जाऊन सूर्यास्त पाहूया. त्यामुळे आमचा थोडा वेळ वाचला आणि सूर्यास्त साठी आम्ही वेळेवर पोहोचलो. बीचवर सूर्यास्त बघायला मला खुप आवडतो. सूर्य अस्ताला जाताना रंगांची उधळणं करून जातो आणि जाताना आपल्याला काहीतरी देऊन जातो परत दुसर्या दिवसाची नवीन सुरुवात घेऊन उगवतो. प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण दिसते. दूर वर पसरलेल्या बोटी, पॅराग्लाइडिंग करणाऱ्या बोटी, उत्साहाचे वातावरण, कोणी पतंग उडवतयं, कोणी फक्त समुद्र बघतोय, कोणी स्पोर्ट खेळतंय आणि कोणी सूर्यास्ताचा नजारा डोळ्यात सामावून घेतंय, कोणी पोहोतंय तर कोणी मस्ती करतोय. असे रंगीबेरंगी आणि चैतन्यमय वातावरण होते. त्यात मला Jet-ski स्पोर्ट गेम करायचा होता पण उशीर झाल्यामुळे तिकीटच मिळाले नाही. पण त्याची जागा मी फोटोग्राफी करून भरून काढली. वाळूत नाव काढून फोटो काढणे. आणि दुसरे उद्योग चालूच होते. आणि त्यासोबत गप्पांचा फड चांगलाच रंगला होता.
|
फोटो – सूर्यास्त – कॅन्डोलीम बीच |
फोटो – सूर्यास्त – कॅन्डोलीम बीच |
फोटो – सूर्यास्त – कॅन्डोलीम बीच |
फोटो – सूर्यास्त – कॅन्डोलीम बीच |
|
फोटो – बाघा बीच |
परतीचा दिवस रविवार उजाडला. जाग तर उशिराच आली. नाष्टा आणि अॅक्टिवा परत करायला ११.०० वाजले. सामान सावरून आम्ही ११.३० ला हॉटेल मधून चेक आऊट केले आणि कॅब करून मडगाव स्टेशन वर हजर झालो. भोजन करून तिथेच गप्पांचा फड रंगवला. परतीचा 12 तासाचा रेल्वे प्रवास मित्र मंडळी सोबत करायचा होता. ब1,ब2, ब3 रेल्वे बोगी मध्ये आमचे मित्रमंडळ पसरल होत. मला लहानपणा पासून रेल्वे प्रवास खूप आवडतो. रेल्वे प्रवास कधीच बोर होत नाही. इथे कोणी गाणी ऐकत, पत्ते खेळत, गप्पा मारत आणि चित्रपट बघत आणि कोणी आराम फर्मावत होत. मित्रमंडळ कधी एकमेकांची टर उडवत तर कधी गहन विषयावर चर्चा करत प्रवास चालला होता. श्यामला(मित्र) कधी गाण्याची फर्माईश केली की तो २ ओळी सहज गुणगुणत असे. ५.३० वाजता दूध सागर धबधबा दिसणार होता. त्यामुळे मी तर दरवाजा जवळच एका जागी ४० मिनिटे तळ टोकून होतो. गाडी जशी धबधबा जवळ येते तसे तुम्हाला बघण्यासाठी १५ सेकंदचा वेळ मिळतो. पण धबधब्याचा एकही फोटो चांगला आला नाही. फोटोग्राफी साठी खूप-खूप संयम लागतो हेच सिद्ध होते. धबधबा बघून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. पाण्याचे प्रवाह उंचा वरून खळाळत खाली उडी घेतो आणि आपण डोळ्याने बघून भिजतो. अति सुंदर दृश्य होते आणि वाटत होत की रेल्वे ढगातून जात आहे. दिनेश आपटे (मित्र) यांनी पत्ते खेळताना Pigeonhole Theory सुद्धा कसे लागू होते हे गहन चर्चा करून सांगीतले. रविवारी कोजागिरी पोर्णिमा होती आणि मी मसाला दूध भेटत नाही तरी विचारणा केली पण काही ते भेटले नाही. सध्या टीवीवर अॅड चालू आहे. जिथे मित्र/फमिली तिथेच दिवाळी. त्याप्रमाणे जिथे मित्र तिथेच कोजागिरी पोर्णिमा. आणि मसाला दूध नसले म्हणून काय झाले? आम्ही कॉफी सोबत कोजागिरी जोरदार साजरी केली. कोजागिरी पोर्णिमा साजरी करून दिवस संपला. कोणतीही चांगली गोष्ट लवकर संपते तसे ऑफसाईट आणि ट्रीप सुद्धा लवकरच संपली.
फोटो – दुधसागर परिसर |
फोटो – दुधसागर परिसर |
फोटो – दुधसागर परिसर |
फोटो – दुधसागर परिसर |
फोटो – दुधसागर धबधबा |
Photo/Video Courtesy: Bhagwat, Nilesh, Kaushlendra
Views: 170
Nice description and photos
प्रिय भागवत, गोव्याच्या ट्रिपचे अतिशय समर्पक शब्दांकन. सोबत, योग्य फोटोंची साथ. असेच लिहीत रहा!
@मनोज जपे, खुप खुप धन्यवाद!!!
Thanks!!!
Excellent description, feels like living all moments..
@satyajit Thank you very much!!!
Beautifully written Bhagwat, almost felt as if I'm in Goa.
@Sachin Desai Thank you very much!!!
When someone writes an post he/she keepѕ the thought of a user in his/her brain that how a uѕer can know it.
So that's wwhy this piece of writing is great. Thanks!
अतिसुंदर प्रवासवर्णन! फोटोग्राफी नेहमीप्रमाणेच परफेक्ट! गोव्याची व्हर्च्युअल ट्रिप घडवून आणलीत. धन्यवाद!
@amol kokane खूप खूप धन्यवाद!!! तुमचा प्रतिसाद नेहमी प्रोत्साहित करतो.