गझल – थांबले नाही कुणी…
मराठी गझल वृत्त – कालगंगा/ देवप्रिया
लगावली : गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
मात्रा: २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २६
गझलेत काही कमतरता, चुका असल्यास नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल.
पहिले कडवे श्री.भूषण कटककर,”बेफिकिर” यांची ओळ आहे.
गझल – थांबले नाही कुणी…
घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी
नियती आली समोरी, संघर्ष झाला जरा
वेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी
भूतकाळाला अता नाही कशाचे मागणे,
वर्तमानाला सुद्धा का धावले नाही कुणी
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी
कोंडलेला श्वास माझा जाणले नाही कुणी
काळजावर घाव घेऊनी निघालो एकटा
वादळाला झुंजलो मी मानले नाही कुणी
संपली होती इच्छा माझी कधीचीं अंतरी
ठेवली जवळी व्यथा पण धावले नाही कुणी
गझल – थांबले नाही कुणी… Read More »