एक-दोन वर्षा पासून तुमच्या कुटुंबात एखादी गोष्ट ठरते पण काही कारणा मुळे प्रत्यक्षात येत नाही आणि अचानक एक दिवस आशेचा किरण गवसतो. दिवाळीची लोक जशी आठवण करतात त्याच प्रमाणे प्रत्येक जण स्नेह संमेलन म्हटले की नजर लावून बसलेला असतो. सरिता आणि माधवी वहिनी व्हाट्सअँप वर सहज बोलून जातात की आपण भेटूया का म्हणून? आणि संमेलन प्रत्यक्षात अवतरले. असे म्हणतात की एक दिवस जर तुम्ही आनंदाने आणि कुटुंबां सोबत व्यतीत केला तर तुमचे आयुष्य वर्षाने वाढते.
भालचंद्रने ट्रान्सपोर्टचे व्यवस्थित नियोजन केले होते. आम्ही 8.00 वाजता स्वारगेटला पोहोचलो. 8.30 वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आली आणि आम्ही गाडीत बसलो. वाटेत मनीषा ताई, भाऊजी आणि रोहिणीला घ्यायचे होते. पण आमचा अभिरुची माँलचा थोडा घोळ झाला पण आम्ही त्यांना घेऊन पुढे निघालो. एका सुंदर दिवसाची सुरुवात झाली होती हे आमच्या लक्षात आले नाही. 9.30 वाजता आम्ही सगळे शांतीवनला पोहचलो. शांतीवन ठिकाण निवड होण्या आधी आमच्या कडे 1)शांतीवन 2) गिरीवन असे पर्याय होते. त्यात शांतीवन सर्वानुमते ठरले होते.कार्यक्रमाची नभा वहिनीनी सूत्र संचालक म्हणून जबरदस्त सुरुवात केली. जेष्ठ मंडळीनी दिप प्रज्ज्वलन केले. बलशेटवार कुटुंब कसे मोठे आणि काहीतरी वेगळे आहे या पासून सुरुवात झाली. बाबांनी बलशेटवार कुटुंबा विषयी माहिती पुरवली. व्यंकोजी नाईक कसे होते आणि त्याची ताकत किती होती याबद्दल माहिती सांगितली. सावरगाव(बापुदेव) इथून आपले पूर्वज 200 वर्षा पूर्वी शिरूरला स्थाईक झाले आणि नाईक आडनाव बदलून बलशेटवार कधी झाले यांची सुद्धा माहिती सांगितली. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाने स्टेज वर येवुन स्वत: ओळख करून दिली. सगळ्यांत चांगली ओळख गणु आणि विठु दादाने करून दिली. त्यांनी शिरूर ते सातारा प्रवास कथन केला आणि सध्या काय करतात हे नमूद केले.
सगळ्यांत जास्त आनंद मला संगीत खुर्ची खेळताना आला. त्यात माधवी वहिनीनी 4 प्रकारे विभागणी केली होती.1)लहान मुले 2)किशोरवयीन 3)महिला 4)पुरुष यात बाबा, आई, काकू, श्रीपाद दादा ते सर्वात लहान मुलांनी सुद्धा खूप आनंद घेतला. आनंद म्हणजे शेवटी काय असते आपल्या कुटुंबातील व्यक्ति सोबत वेळ व्यतीत करून प्रत्येक क्षण जगणे. तोच आनंद तुमच्या चेहर्यावर दिसतो. भैयाला कधीच मी एवढा शांत आणि निवांत बघितले नव्हते. मला तर वाटते त्याने प्रत्येक क्षण मस्त उपभोगला. कोणताही खेळ म्हटला की त्यात कोपरखळ्या, मोज-मस्ती, धिंगाणा आणि हार-जीत आली. त्यात बाबा, आईला, काकूला संगीत खुर्ची खेळताना मनाला खुपच शांतता लाभली आणि मज्जा आली. श्रीपाद, आणि इतर दादा लोकांना संगीत खुर्ची खेळताना बघून मस्त वाटले. “आँन द स्पॉट अवार्ड” आणि “Housie/हौसी” खेळाला सुद्धा सगळ्यांनी खुप भरभरून प्रतिसाद दिला.
मग जवळपास 1.00 वाजता लंच ब्रेक/भोजनाची 1 तासासाठी सुट्टी झाली. भोजना नंतर काही लोकांनी बांबूच्या झाडाखाली गप्पा ठोकल्या आणि काहीनी आराम करणे पसंत केले. गप्पा टप्पा, खेचा-खेची, कोपरखळ्या या गोष्टी चर्चे सोबत तर आपोआप येतात. त्यामुळे 1 तासाचा विराम 1.30 तासाचा झाला. त्यानंतर विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्रम होता. त्यात बलशेटवार मंडळी फक्त व्यावसायिक कामात अग्रेसर नसून इतर कलागुण सुद्धा जोपासतात हे सिद्ध झालं. भरतनाट्यम, कविता वाचन आणि डान्सचे स्टेज परफॉर्मन्स झाले. प्रेक्षकांनी मुक्तकंठाने टाळ्या वाजवल्या.
त्यानंतर जो काही गोंधळ सगळ्यांनी घातला 3-4 खेळाच्या माध्यमातून तो लाजवाब होता. खेळ सुरु झाल्यानंतर खुपच मज्जा आली. वस्तु पासून ड्रेस बनवायचा होता. प्रत्येकाच्या डोक्यातून सुबक कल्पना मांडल्या. त्या प्रत्यक्षात आणल्या आणि 4 लहान मुलांना एक खास ड्रेस बनवण्यात आला. ज्यां ग्रुपचा पहिला नंबर आला त्यांचा जल्लोष बघण्या सारखा होता. जिंकण्यात सर्व भागीदार होते. लहान मुलांनी कल्ला केला चाँकोलेट मिळाल्यावर. त्यांचा उत्साह जबरदस्त होता. एक खेळ सगळ्यांना संघठीत आणि एकरूप करतो. फुगे फोडण्याच्या गेम मध्ये जाम मज्जा आली. जेष्ठ मंडळीनी(आई, बाबा आणि शकुंतला काकू) यांनी विजेत्यांना बक्षीस वाटप केले. २ Housie/हौसी विजेत्यांना रोपटे देण्यात आले. लहान मुलात “उत्कृष्ट वेशभूषा – मुलगा” आणि “उत्कृष्ट वेशभूषा – मुलगी” यांना सुद्धा बक्षीस देण्यात आली. “पार्थ” आणि “सिद्धी” या पुरस्काराचे मानकरी ठरले. कोणत्याही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक मनुष्यबळ, पैशाचे नियोजन आणि दुसरे वेळेचे नियोजन. आणि मोठ्यांच्या मार्गदर्शना मुळे उत्कृष्ट कार्यक्रम राबविण्यात येतो. बक्षीस वाटपा नंतर पुढचे संमेलन कधी व केव्हा यावर सविस्तर चर्चा झाली.
दुपारचा चहा घेण्यासाठी 5.40 वाजले आणि केक खाण्यासाठी 6 पण कोणाचाही उत्साह कमी झाला नव्हता. मी असा पहिलाच कार्यक्रम बघितला ज्यात पूर्ण वेळ 9.00 ते 6.30 सगळे उत्साही होते. लहान मुलांचा जल्लोष तर ओसंडून वाहत होता. त्यात आमची किटू रेन डान्स झाला नाही म्हणून थोडी नाराज झाली पण आम्ही एवढे व्यस्त झालो की 5.30 कधी झाले हे कळलेच नाही. मग त्यात सामूहिक छायाचित्रण झाले. जवळपास 6.30 होऊन सुद्धा कोणाचा पाय निघत नव्हता. हेच या कार्यक्रमाची यशस्वी होण्याची पोहोच पावती होती. शेवटी बऱ्याच जणांना घरी पोहोचण्यासाठी २ तास लागतील म्हणून गाडी सुटली. आम्हाला घरी पोहोचण्यासाठी 8.30 वाजले पण एक सुंदर दिवस व्यतीत केल्याचे समाधान सगळ्यांच्या चेहर्यावर होते. मला तरी काहीच थकवा जाणवला नाही कारण मी आनंदात होतो.
Views: 28