काही संवाद जबरदस्त आहेत. लढाईचे काहीच क्षण दाखवलेले नाहीत. लढाईचे सीन जास्त खुलवायला पाहिजे होते. बाहूबलीचे लढाईचे दृश्य आणि कथा जसा त्या चित्रपटाचा आत्मा आहे त्याच प्रकारे फक्त कथा पद्मावत चित्रपटाचा आत्मा आहे. घुमर गाणे चांगल्या रित्या छायाचित्रित केले आहे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. इतर गाणी लक्षात राहत नाहीत. होळीचा प्रसंग मस्त खुलवलाय. एकमेकांना रंग लावण्याचा क्षण सुंदर झाला आहे. संवाद उत्तम रित्या लिहिले आहेत. एक-दोन दृश्यावर लोकांना हसू येते. दिग्दर्शक चित्रपट करताना किंबहुना कलाकार कला सादर करताना थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेत असतो. भन्साळी यांनी सुद्धा घेतली. बाजीराव-मस्तानी वेळेस त्यांनी बाजीराव या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला नाचताना दाखवले आहे. या वेळेस राणी पद्मावतीला “घुमार” आणि खिलजी व्यक्तिरेखेला “खली बली” या गाण्यावर नाचताना दाखवले आहे.
एका प्रसंगात शाहिदचे डोळे बोलतात. त्याचा संयत अभिनय भावतो. चित्रपट जरी रणवीरची व्यक्तिरेखे वर जास्त फोकॅस करतो तरी शांत डोक्याचा शाहीद कुठे तरी भावतो. शेवटच्या लढाईचे क्षण सुद्धा ट्राय चित्रपटाची आठवण करून देतात. शेवटच्या लढाईत बाण लागलेले दृश्य मनावर ठाव करते. महारावल रतनसिंगया व्यक्तिरेखेचे पद्मावती वरील प्रेम, त्याग, रजपूताची मान आणि प्रतिष्ठा यांचे अभिनया द्वारे सुंदरपणे रेखाटले आहे. होळीचा प्रसंगाची दृश्य सुंदर आहेत. त्याचा “चिंता को तलवार की नोक पे रखे है ओ राजपूत” हा संवाद जबरदस्त आहे.
राणी पद्मावती पात्र दिपिका अक्षरश: जगली आहे. जंगलात राहणारी राजकुमारी, प्रेमिका आणि महरावल रतनसिंग यावरील प्रेम अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे. हरणाच्या मागे वेगात पळणारी राजकुमारी ते चित्तौड मध्ये राहून शत्रूचे धड पाठवण्याची अट घालणारी राणी उत्तम प्रकारे सादर केली आहे. एकाच व्यक्तीच्या विविध छटा तिने लीलया सांभाळल्या आहेत. रतनसिंगच्या पहिल्या राणी सोबत खुपच कमी दृश्य आहेत. शेवटचा अर्धा तास पूर्ण तिच्या वर केंद्रीत आहे. शेवट जवळपास सगळ्यांना माहीत आहे तरी पण तिने या प्रसंगात जीव ओतला आहे आणि नेत्रदीपक शेवट केला आहे. शेवटचे दृश्य तिने पूर्णपणे जिवंत केले आहे. शेवटच्या दृश्याचा असा परिणाम होतो की प्रेक्षक शांतपणे प्रेक्षागृह सोडतात.
तरी पण चित्रपटाचा आत्मा कुठे तरी हरवलाय. कथेला नाविन्यपूर्ण खुलवता आले असते. चित्रपट प्रमाणबद्ध चौकटीच्या बाहेर जात नाही. काही प्रसंग खुलवायचे राहिलेत. महारावलच्या सेनापतीचा शहीद होण्याचा भावनिक क्षण आणखी विस्तृत केला असता तर त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळाला असता. मध्यंतरी थोडा वेळ चित्रपट संथ होतो. कधी-कधी वाटते चित्रपट लवकर संपावा. खली बली गाण्याची गरज नव्हती. हे गान उगाच मध्ये टाकल्याच वाटते. रझा मुराद आणि अदितीराव हैदरी यांनी आप-आपल्या व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. आणि मस्त अभिनय केलाय राघव या व्यक्तिरेखेने सुद्धा. चित्रपट जरूर पाहण्या सारखा आहे. नाही पाहिल्यास रणवीर, शाहिद आणि दिपिकाच्या यांच्या चांगल्या अभिनयाला मुकाल.
चित्रपटाच्या सकारात्मक बाजू
-कलाकारांची दमदार फळी
-उत्तम कथा, भव्य आणि उंच देखावे
-देखणा अभिनय
चित्रपटाच्या कमकुवत बाजू
-लढाईचे क्षण अति उत्तम करता आले असते.
-१-२ गाणी जास्तीची घुसवली आहेत
-मध्यंतरी थोडा संथ होतो
-दुसऱ्या फळीतील कलाकाराला जास्त संधी नाही
Views: 31