#Sharktankindia #enterpreurship
प्रत्येक माणसाला काही तरी नवीन करून दाखवायची इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असते. त्यासाठी अपार मेहनत, उत्कृष्ट वस्तु आणि गुणवत्तेचा स्तर वाढवून, सतत प्रयत्न करून, ग्राहकांना चांगली सेवा आणि इतर सुविधा पुरवून आपल्या कंपनीचे उत्पादन, सेवा देऊन प्रगती मार्गावर चालण्याची इच्छा असते.
शार्क टॅंक हा टीव्ही शो अमेरिकेत २००९ साली सुरू झाला. शो मध्ये ५ गुंतवणूक दार ( Investor or shark) असतात आणि नवीन कंपनी(pitcher/ ग्राहक कंपनी) ज्यांना व्यवसाय करण्यासाठी पैसा, मार्गदर्शन पाहिजे असतात असे स्वरूप आहे. हा शो भारतीय लोकांसाठी नवीन कल्पना आहे. ज्या नवीन कंपनीला अधिक भांडवलाची गरज आहे किंवा ज्या कंपनी उत्पादन आणखी प्राथमिक स्वरुपात आहे.
मान्यवर असे ५ गुंतवणूकदार( Investor or shark) आहेत. यात अनुपम मित्तल सारखा ज्याने २०० कंपनी मध्ये गुंतवणूक केली आहे. त्याची सगळी संपत्ती 1.86 अब्ज आहे. अनुपम मित्तल शादी.कॉम कंपनी चा सर्वेसर्वा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे. सगळ्यात शांत स्वभावाचा अनुपम आहे. अमन गुप्ता हा boat कंपनीचा को-फाऊंडर आणि CMO आहे. अशनीर हा bharatPe कंपनीचा एमडी आणि को-फाऊंडर आहे. तर एमकुयर (emcur) फार्मा मधून नमिता थापर, लेन्सकार्ट (Lenskart) मधून पीयूष बंसल, शुगर कॉस्मेटिक्स मधून विनिता सिंग, मामाअर्थ मधून गजल अलघ आली आहे. कोणी एमडी तर कोणी को-फाऊंडर तर कोणी सीईओ आहे. प्रत्येक जण आप आपल्या क्षेत्रात यामध्ये नामवंत, श्रीमंत, संघर्ष करून नाव कमावलेले आहे. पीयूष, अमन, नमिता, गजल, अशनीर India’s 40 under 40, अनुपम outstanding serial invester, विनीता most powerful women in business असे नावाजलेले लोक आहेत. प्रत्येक शार्कची संपत्ती कमीत कमी ४०० कोटी तरी असेल जास्त किती असेल तर सांगता येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे ज्यांना गुंतवणूक पाहिजे असते ते सुद्धा प्राथमिक व्यवसाय करून मेहनत करून कंपनीची पुढे प्रगती करण्यासाठी पैसे बदल्यात कंपनीचा काही हिस्सा विकायला आलेले असतात. काल परवाच माळेगावातील एक होतकरू शेतकरी ‘जुगाडू कमलेश’ आला होता. त्याने शेतकर्यासाठी फवारणी साठी बहूउपयोगी सायकल बनवली होती. त्याने जबरदस्त सादरीकरण केले. पीयूष बंसल कडून कमलेशला १० लाख रुपये (५०% इक्विटि) आणि कर्ज सुद्धा मिळाले. तो नक्कीच आपल्या स्वप्नांना पूर्ण करेल. मी तर एक-एक pitcher बघून हैराण झालो. भारताच्या गल्ली बोळात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. त्याला फक्त पैलू पडायची गरज आहे. म्हणतात गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्या प्रकारचे व्यावसायिक इथे आले आहेत. कोणाला पैसाची गरज आहे कोणाला मार्गदर्शनाची गरज आहे. इथे कोणी फक्त नवखे, मुरलेले व्यवसायिक असे सगळ्या प्रकारचे गरजवंत आहेत.
खरे तर कुठे तरी आपण प्रेरणादायी माणसे शोधत असतो. त्यात यशस्वी उद्योजक असतील तर आपण त्यांचे अनुकरण करतो. आणि खरेच प्रत्येक शार्कची कहाणी प्रेरणादायी आहे. त्यामुळे या प्रसिद्ध लोकांनी इतर लोकांना मनाला लागेल असे बोलू नये. अनुपम, विनिता सिंग यांच्या कामातून मी प्रभावित झालो आहे. असे म्हणतात की शार्क टॅंक US मध्ये झालेल्या व्यवसायिक करार फक्त ६०-७०% अस्तित्वात येतात. पण एकदा शार्क टॅंक मध्ये आल्या नंतर त्या कंपनीचा sale १५% ते २०% वाढला आहे. कमीत कमी तुमची आणि तुमच्या कंपनीची पब्लिसिटी फुकटात होऊन जाते. दोन्ही investor आणि स्टार्टउप कंपनीसाठी Brand value ला जबरदस्त फायदा होत असतो.
नवीन pitcher(नवीन गुंतवणूकदार) हे सादर करताना त्यांचा आत्मविश्वास बघण्या सारखा असतो. शार्कचे आपसातले संभाषण सुद्धा मजेदार आणि खेळीमेळीचे असते. व्यवसायातील टेक्निकल गोष्टी सुद्धा कळतात. जसे की gross profit, making charges, marketing, etc. शो चे नवीन स्वरूप, चांगले दिग्दर्शन, उत्कृष्ट सादरीकरण, उत्तम छायांकन आणि छान पार्श्वसंगीत त्यामुळे ज्यांना नियमित टीव्ही मालिका पेक्षा काही तरी नवीन बघायचे आहे त्यांच्या साठी उत्तम शो आहे. एकदा बघाच.
Views: 371
खूप छान लिहीले आहे भागवत
Thanks @Meenu