सुट्टीचे दिवस जसे येतात तसे जातात. कोणता दिवस सत्कारणी लागतो आणि कोणत्या दिवशी निव्वळ टाइमपास होतो. पण एखादा दिवस काहीही न ठरवता खूप छान जातो त्याचे विशेष अप्रूप वाटते. बरेच दिवस झाले लहान पणीचा मित्र ‘कृष्णाजी’ भेटला नव्हता. एक दिवस त्याने त्याच्या शेतात येण्याचे आमंत्रण देऊन लगेच घरी घ्यायला आला. मी विचार केला की 1-2 तास शेत बघून यावे. पण तिथे गेलो आणि संध्याकाळ आनंदात घालवून परतलो.
शेतात जात असतानाच आमच्या गप्पा सुरू झाल्या. आस्थेने केलेली विचारपूस मेडिकलच्या १० गोळ्या पेक्षा गुणकारी असतात. आमच्या गप्पा शेत बघत-बघत चालू होत्या. नोकरी कशी सुरू आहे? करोना काय म्हणतोय? असे विषय येत होते आणि रेल्वेच्या डब्या प्रमाणे मागे पडत होते. त्याचे माझे शेत बघून झाले पण गप्पा काही संपल्या नाहीत. कारण खूप वर्षा पासून राहिलेला बोलण्याचा कोटा पूर्ण करायचा होता. शेतात काय – काय सुविधा आहेत आणि काय पेरले आहेत हे सांगताना त्याला स्फुरण चढत होते.
शेतात जात असतानाच आमच्या गप्पा सुरू झाल्या. आस्थेने केलेली विचारपूस मेडिकलच्या १० गोळ्या पेक्षा गुणकारी असतात. आमच्या गप्पा शेत बघत-बघत चालू होत्या. नोकरी कशी सुरू आहे? करोना काय म्हणतोय? असे विषय येत होते आणि रेल्वेच्या डब्या प्रमाणे मागे पडत होते. त्याचे माझे शेत बघून झाले पण गप्पा काही संपल्या नाहीत. कारण खूप वर्षा पासून राहिलेला बोलण्याचा कोटा पूर्ण करायचा होता. शेतात काय – काय सुविधा आहेत आणि काय पेरले आहेत हे सांगताना त्याला स्फुरण चढत होते.
कोणत्याही गोष्टीची नाळ जोडलेली असेल तर त्या गोष्टी बद्दल तुमच्या आठवणीत, आचार, विचारात झिरपतात. पण नाळ नसेल तर तेवढी ओढ राहत नाही. मी माझ्या शेतात मोजून 10 वेळेस गेलो असेल. पण वर्षातील एक महत्त्वाच्या दिवशी मी माझ्या शेतात नक्की जातो ते म्हणजे ‘वेळा अमावस्या’ सण. पण माझ्या मित्र नोकरी अहमदपूरला (10 किमी) असून दररोज शेतात येऊन काम करून शेवटी आई वडीलांना भेटून ताजे दूध घेऊन जातो. ऑफिस करून परत संध्याकाळी शेतात काम करून परत दुसर्या दिवशी सकाळी पाचला शेतात हजर. यालाच खरी शेती बद्दलची ओढ म्हणतात.
तिथे कृष्णाजीचे आणखी मित्र आले होते. कृष्णाजीचा लहान भाऊ(चंद्रशेखर) कृषी खात्यात आहे. त्यामुळे शेतात आलेल्या सगळ्या सोबत शेतात काय सुधारणा करता येऊ शकतात याचे छोटे चर्चा सत्रच भरले. मग हुरडा पार्टी साठी शेंगा, हरभरे आणायला आम्ही गेलो. शेतातील शेंगा काढून, त्या निवडून परत भाजण्यासाठी तयारी केली. तो पर्यंत काही लहान मुले आली होती त्यांचे आणि मोठ्यांचे फोटो सेशन केले. लहान मुलांचे झोपाळा, झाडे, आणि एकत्र असे काही फोटो काढले. लहान मुलांचे एक्सप्रेशन नैसर्गिक असतात. त्यामुळे त्यांचे फोटो चांगलेच येतात. तो पर्यंत खाण्याची पार्टीची जय्यत तयार झाली होती. मस्त शेंगा भाजून पसरून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या बाजूने आम्ही सगळे बसलो होतो. ऊस आधीच खाऊन झाला होता. हरभरे घरी घेऊन जाण्यासाठी बाजूला काढून ठेवले होते. आमची हुरडा पार्टी चालू होती पण कृष्णाजीचे आई, वडील, मोठा भाऊ चे (सुदर्शन) काम चालूच होते. कष्टाळू माणसे आपल्या कामात कधी खंड पडू देत नाहीत.
पार्टी झाल्या नंतर काकांनी घरी यायला सांगीतले. परत घरी गेल्या नंतर काका, काकू आणि सगळ्यांनी छान पाहुणचार केला. चहा पान झाले. काही मिनिटातच गप्पा पुन्हा रंगल्या. पाहुण्याची ओळखपाळख झाली. माझ्या गावापासून ही वाडी अतिशय जवळ आहे पण कधीही गेलो नव्हतो. माझी आपुलकीने वास्तपुस्त केली. मित्राशी झालेली खूप दिवसा नंतर झालेली चांगली भेट, आठवणीची देवाणघेवाण, मस्त हुरडा पार्टी, छान फोटोसेशन, शेतीशी हितगुज, नवीन गाठी-भेटी, आणखी काय पाहिजे आपला दिवस सत्कारणी लागण्यासाठी.
Views: 213
Very good
Thanks Shiva!!!