कविता : असते… नसते…

असते… नसते…

खरं मनसोक्त मुक्तपणे जगायचे असते
सौख्य लाभलेले कधीच मोजायचे नसते

आपल्या विचाराची सांगड घालायची असते
दुसर्‍याच्या मनातील मात्र गूढ उमजत नसते

जीवनात वेळेवर ऍडजस्ट करायचे असते
प्रत्येक वेळेस परिस्थिती मात्र कठोर नसते

निवडीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असते
विचारात जास्त तडजोड करायची नसते

स्वआवड निवड अशीच जपायची असते
इतरांची आवड मात्र अव्हेरायची नसते
 
इतरांना आयुष्यात सामावून घ्यायचे असते   
जीवनभर एकाच व्यक्तीसाठी झुरायचे नसते   
 
अवघड निर्णय घ्यायला मात्र शिकायचे असते
आयुष्यात जबाबदारी येताच झटकायची नसते
 

Views: 121

Leave a Reply