कविता : जाणिवांच्या फटीतून…

जाणिवांच्या फटीतून

जाणिवांच्या फटीतून अनपेक्षित आले
तो क्षण सुखाची झलक दाखवून गेले   
 
आडोसा धरून सुख लपून बसले
शोधायला गेलो मात्र नाही गवसले
 
अपयशाच्या राखेत सौख्य निपचित पडले  
नवीन प्रयत्नांना तेथूनच धुमारे फुटले  
 
विजय पराजयाने लपंडाव करून नाचवले
सुख दु:खाचे नाते मात्र नाही जुळले
 
दु:खाच्या वाळवंटात प्रयास थकले
तेथेच यशाचे काटेरी मार्ग दिसले

आनंद, उदास सापेक्ष जरी असले
तरी फक्त समाधानीच जीव तरले   

Views: 113

Leave a Reply