Drishyam 2 Poster

ब्लॉग : चित्रपट परीक्षण : Drishyam 2 – The Resumption : – जबरदस्त, उत्कंठावर्धक सिक्वेल

बहुतेक जणांनी 2015 साली प्रदर्शित झालेला आणि अजय देवगणच्या अभिनयाने साकारलेला द्रश्यम चित्रपट बघितला असेल. या चित्रपटाची कथाच खूपच दमदार असल्याने आजही ऑक्टोबर महिन्यात “दोन ऑक्टोबरला गोव्याला सत्संग ऐकायला गेलो होतो” हा संवाद मेम्स च्या माध्यमातून इंटरनेटवर व्हायरल होतो. हीच एका यशस्वी चित्रपटाची पावती आहे. खरे तर हा 2013 सालातील मल्याळम चित्रपट “Drishyam” चा रीमेक होता. “Drishyam” मल्याळम चित्रपटाचे तेलुगु, कन्नड, तमिळ, सिंहली, चायनीज भाषेत रीमेक बनलेले आहेत.

आणि आत्ता मूळ मल्याळम चित्रपटाचा “Drishyam 2 – The Resumption” सिक्वेल मागील 19 फेब्रुवारी 2021 ला इंग्लीश सब-टाइटल सोबत प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी हिन्दी, किंवा कोणत्याही भाषेत हा 2015 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बघितला असेल तर तुम्ही हा सिक्वेल “अमेझॉन प्राईम” वर नक्कीच बघू शकता. पात्र प्रत्येक भाषेत जवळपास सारखी असल्याने तुम्हाला विशेष कष्ट घ्यायची गरज पडणार नाही. खरे तर म्हणतात एखाद्या गाजलेल्या, नावाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल तितकाच दमदार आणि जबरदस्त नसतो. कारण असे सिक्वेल फक्त पहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर पैसा कमावण्याचे साधन असते. पण Drishyam 2 चित्रपट या कल्पनेलाच उखडून टाकतो. 

पहिल्या चित्रपटाच्या कथा, पटकथा प्रमाणे या चित्रपटात कथा दमदार, बेमालूमपणे चाणाक्ष आणि तितकीच उत्कंठा वर्धक आहे. या चित्रपटाच्या पहिला भाग थोडा संथ वाटतो. प्रेक्षकांना पहिल्या भागात प्रत्येक घटना, प्रसंग आणि नवीन व्यक्तिरेखा स्थापित करायला वेळ घेतो. कारण प्रेक्षकांना पहिल्या भागाचा अंदाजच येत नाही. एक खूनी “Jose” पळत गावात येतो आणि स्वत:च्या घरी परतल्या नंतर त्याला अटक होते. येथून या चित्रपटाची सुरुवात होते. या दरम्यान 6 वर्ष निघून जातात. आधी गावातील लोका साठी हीरो असलेला “जॉर्ज कुट्टी” आत्ता प्रसिद्ध आणि श्रीमंत थिएटर व्यावसायिक साठी आत्ता जवळपास खलनायक असतो. गावकरी “जॉर्ज कुट्टी” च्या कुटुंबाच्या विरोधात वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरवत असतात. इकडे “जॉर्ज कुट्टी” आपल्या केबल व्यवसाय साठी त्याच्या ऑफिस मध्ये सगळी कडे cctv लावून घेतो आणि मोबाइल वरुन लक्ष ठेवत असतो. “जॉर्ज कुट्टी” ची पत्नी “राणी” आणि दोन्ही मुली त्या प्रसंगातून बाहेर यायचा प्रयत्न करत असतात. त्यांना घरा बाजूने किंवा समोरून पोलिस व्हॅन जाते तेव्हा भीती वाटत असते. त्यात बाजूला राहणाऱ्या “सरिता” ची राणीची मैत्री होते. ज्या वेळेस “जॉर्ज कुट्टी” घरी नसतो त्या वेळेस राणी तिला घरी राहायला बोलवते. या सगळ्या सामान्य घटना चित्रपटाच्या पहिल्या भागात घडतात. मोहनलालने “जॉर्ज कुट्टी” काय जबरदस्त साकारला आहे. भावनाप्रधान पिता, आवेशपूर्ण कुटुंब प्रमुख, चतुर नियोजक, मित्रांचा मित्र आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा चातुर्यपूर्ण आखलेला डाव. मोहनलालने या चित्रपटात जीव ओतला आहे.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’   https://bhagwatbalshetwar.com/filmreview/2020/tanhajifilmreview.htm

खरी मज्जा तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात शेवटच्या 40 मिनिटात येते. असा विलक्षण क्लायमॅक्स चित्रपटाचा दिग्दर्शक “जितू जोसेफ” च करू शकतो. शेवटच्या 40 मिनिटात चित्रपटाच्या पहिल्या दृश्या पासून ते कोर्ट मधील केस पर्यंत प्रचंड वेगाने काय-काय घडते दाखवण्यात येते. “विनायचंद्रण” हा “स्क्रीनरॉयटर” जेव्हा “जॉर्ज कुट्टी” चे एक-एक कारनामे उलगडतो. तेव्हा सगळे उपस्थित चाटच पडतात. मागील सहा वर्ष “जॉर्ज कुट्टी” कसे स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्या साठी धडपड आणि काय नियोजन करतो आणि त्यात येणारे तीव्र वळण. हे पडद्यावर बघणेच उचित राहील. मानला बा या दिग्दर्शकाला. कथा कशी सुरू होते आणि प्रत्येक पात्राचे घटनांशी असणारे नाते. पोलीस आणि कुटुंबा मध्ये घट्ट पाय रोवून थांबलेला “जॉर्ज कुट्टी”. पोलीस “जॉर्ज कुट्टी” वर लक्ष ठेऊन आहेत का “जॉर्ज कुट्टी” पोलीसावर लक्ष ठेवून आहे हे पडदावर पहाणे अत्यंत रोमांचपूर्ण आहे. दिग्दर्शकाची कमाल आहे. चित्रपटात समांतर कथा चालत असते. जोस खरे तर एक खून करून आलेले असतो पण त्याने त्या गुन्हाची शिक्षा भोगलेली असते. त्यामुळे त्याला पश्चात्ताप किंवा भीती उरत नाही. त्यामुळे जोसे सर्वसाधारण जीवन जगत असतो. त्याच्या बदल्यात “जॉर्ज कुट्टी” आणि त्याचे कुटुंब एक खून करून स्वतंत्र असून सुद्धा पश्चात्ताप आणि भीती युक्त जगत असता. भविष्यातून हाल अपेष्टा सुटण्यासाठी जीवन पणाला लावतात. दिग्दर्शक कोण योग्य आहे हे प्रेक्षकांवर सोडतो.

बाकी सगळ्या सह कलाकारांनी केलेले उत्तम काम करून साथ दिली आहे. इतर व्यक्तिरेखा जसे की नवीन IG थॉमस याने अतिशय छान काम केले आहे. बाजूला राहणारे सरिता आणि तिचा नवरा यांचे सुद्धा काम चांगले आहे. जुनी IG “गीता” आणि जोसे, 4 गावकरी यांनी आपले काम चोख केले आहे. चित्रपटाची कथा आणि सादरीकरण इतके जबरदस्त आहे की मसाला आयटम सॉन्ग आणि अतिरेकी कॉमेडीची काहीच गरज नाही. वेगळ्या पेरणीचे ट्विस्ट असलेली पटकथा. चित्रपटाची कथा म्हणजे थोडक्यात घाटात जाताना असणारी छोटी -छोटी अवघड चढी वळणे. पण शेवटी शिखरावर पोहोचल्यावर अंगावर काटा आणणारी दरी असते. या मुळे चित्रपट जमून आला आहे. चित्रपटात एकच गाणे आहे. मल्याळम असल्याने ते लक्षात राहत नाही. दिग्दर्शक चित्रपटातून एक संदेश दिला आहे. एक खूनी तो त्याची सजा पूर्ण करून आला आहे आणि दुसर्‍या बाजूला “जॉर्ज कुट्टी” जो मागे झालेल्या चुकी पासून वाचण्यासाठी आणि आशंकेत राहून पूर्ण वर्तमान नियोजन करण्यात घालवतो. चित्रपटाचे पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाला साजेसे, गंभीर, आणि रहस्यमयी आहे. पार्श्वसंगीत मोक्याच्या क्षणी उत्कंठा वर्धक आहे.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक  https://bhagwatbalshetwar.com/filmreview/2019/filmreviewfatteshikast.html

अतिशय उत्तम कास्टिंग, मोहनलाल चा करिष्माई आणि दमदार अभिनय, उत्तम सह कलाकारांची फौज, पहिल्या चित्रपटाच्या तोडीस तोड कथा, वैविध्य पूर्ण आणि बेमालून सादरीकरण, चित्रपटाला साजेसे पार्श्वसंगीत त्यामुळे चित्रपट एका वेगळ्याच ऊंचीवर जातो. पहिला भाग जरी संथ असला तरी दूसरा भाग अतिशय वेगवान आहे. इतर विभाग जसे की छायांकन, स्टंट, संपादन, पोशाख डिझाइन, आर्ट आणि साऊंड विभाग या सगळ्या विभागानी आपले १०० टक्के हातभार लावला आहे. जबरदस्त कथा, तितकीच वैविध्य पूर्ण पटकथा, ट्विस्ट आणि टर्न असणारे सादरीकरण, अभिनय, चांगले संपादन (Editing), उत्तम उत्पादन मूल्य (Production value), सोबत सुंदर छायांकन (cinematography) यामुळे चित्रपटाला मी देतो 5 स्टार. तुम्ही पहिला कोणत्याही भाषेतील चित्रपट बघितला असेल तर हा मल्याळम सिक्वेल इंग्लीश सब-टाइटल बघायला 100 टक्के आवडेल. पहिल्या चित्रपटा प्रमाणे “जॉर्ज कुट्टी” स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी यशस्वी होतो की पोलीस त्याला शिक्षा देण्यास कायद्याच्या कचाट्यात पकडतात. त्या साठी चित्रपट जरूर पहाच.

drishyam-2 poster
Drishyam 2 – The Resumption Poster

Views: 747

4 thoughts on “ब्लॉग : चित्रपट परीक्षण : Drishyam 2 – The Resumption : – जबरदस्त, उत्कंठावर्धक सिक्वेल”

  1. पाच स्टार हे खूपच झालं… माझ्या मते, ३ स्टार ठीक आहे.
    एखाद्या डेली सोप सारखी गोष्ट वाटते. आधी गुंतागुंत दाखवायची आणि मग शेवटच्या ५ मिनिटांत ती उलगडून सांगायची.
    मध्यंतरापर्यंत तर अगदीच रटाळ चित्रपट होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला हिरो दाखवणे कितपत योग्य किंवा नैतिक आहे. चित्रपट, पुस्तके, फोटो, वृत्तपत्र, नाटक,सोशल मीडिया हे खूप प्रभावी साधने आहे त्यांचा विनियोग योग्य आणि समाज हितासाठी झाला तरच फायदा आहे.

    1. Bhagwat Balshetwar

      मी मूळ मल्याळम “Drishyam 2 – The Resumption” चित्रपटाचा review २०२१ साली लिहिला आहे. आत्ता आलेला हिंदी Drishyam 2 मी बघितलेला नाही. त्यामुळे हिंदी Drishyam 2 वर comment करू शकत नाही. मल्याळम “Drishyam 2 – The Resumption” हा अतिशय चांगला आहे. “एखाद्या गुन्हेगाराला हिरो दाखवणे कितपत योग्य किंवा नैतिक आहे.” यावर तर खूपच चर्चा करण्या सारखी आहे.

Leave a Reply