कविता : गौरव

सन्मान माझा उन्मळून गेला
मातीत मिसळला संपून गेला
कीर्ती माझी स्तंभित कुंठली
स्वाभिमान माझा सांडून गेला

राहिले फक्त अवशेष त्याचे
किती गोडवे गाऊ व्यर्थ त्याचे
अपमान मला धडकून गेला
मानभंगा कुठे शोधू उत्तर त्याचे

मोडला असेल स्वतःचा कणा
वाकला गेला स्वाभिमानी बाणा
घेऊ हवेत नवीन स्वच्छंद भरारी
कणा, बाणा, जोडून जोखुन मना

Views: 78

Leave a Reply