गझल: काळजाला ठेच


#वृत्तबद्ध_कविता
वृत : देवप्रिया
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
2122 2122 2122 212 = एकूण मात्रा: 26  
 
*काळजाला ठेच*
काळजाला ठेच ही, आता भरावी वाटते
मी पणाला विश्रांती, कीर्ती उरावी वाटते
 
दुसर्‍याचा आदर्श डोळ्या समोरी का ठेवू
स्व विचारांची वाट आता धरावी वाटते 
 
आसक्त दीर्घ सुखाची वाट कुठे संपली 
मानवाला दु:खाची रात्र सरावी वाटते
 
जो प्राक्तनाशी लढूनी काम सिद्ध करतो
क्लांत जीवाला फक्त आसच जगावी वाटते
 
माणसाने माणसाशी प्रेमाने किती वागावे
आपली व्यक्ति स्वत:साठी झुरावी वाटते
 
गोड स्मृतीना पुन्हा गोंजारणे हो कितीदा
पूर्वकाळाच्या कडू स्मृती, पुसावी वाटते
 
दु:ख पीडेचा नगारा वाजवू आता किती   
आपत्तीची पाच ही आता निघावी वाटते 
 
आठवावा काळ किती वेळेला मी आणखी
मागचे सारून प्रगतीच करावी वाटते

Views: 96

Leave a Reply