ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – ‘फॅमिली मॅन’ – ‘सीजन 2’ – जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर

परत एकदा “श्रीकांत तिवारी” फॅमिली मॅन – सीजन 2 घेऊन येत आहे. “श्रीकांत” काही अफाट, अचाट, महाशक्ती असलेला सुपरमॅन किंवा स्पायडर मॅन नाही. त्याच्यावर देशाची आणि कुटुंबाची जबाबदारी आहे. या वेळेस तर देश आणि कुटुंबा वर धोका वाढला आहे. “श्रीकांत” एक प्रेमळ पिता, धूर्त, हुशार, T.A.S.C (टास्क – Threat Analysis and Surveillance Cell) मधील वरिष्ठ अधिकारी, चांगला मित्र आणि संवेदनशील मनुष्य आहे आणि चांगला पती होण्याची सतत धडपड चालली असते. पहिल्या सीजन मधील काही चुका मुळे तो टास्क सोडतो आणि एक आयटी कंपनीत कामाला लागतो. त्यामुळे कुटुंबा सोबत चांगला वेळ व्यतीत करतो. पण त्यामुळे पत्नी सोबत संबंध काही सुधारत नाहीत. आणि इकडे त्याचा मॅनेजर त्याला “don’t be minimum guy” म्हणून हेटाळत असतो. दोघांचे संवाद विनोदी आहेत. “श्रीकांत” मनातले सुख आणि दुख व्यक्त फक्त “JK” समोर फक्त करत असतो. आयटी मध्ये जरी काम करत असला तरी त्याचे मात्र मन टास्क मध्येच असते. सिरीज मधील त्याच्या प्रत्येक फ्रेम मध्ये मनोज जीव ओततो. कोणत्याही फ्रेम मध्ये तो मनोज न वाटता “श्रीकांत”च वाटतो. हताश, धूर्त, हुशार, संवेदनशील, विनोदी, देशभक्त, आणि प्रेमळ व्यक्तिरेखा त्याने जबरदस्त ताकदीने उभारली आहे. यात काही वादच नाही.       

या ‘वेब सिरिज’चे कास्टिंग अतिशय उत्तम आहे. भारतातील विविध वूड मधून चांगले कलाकार निवडले आहेत. (Authentic) औथेंटिक वाटण्यासाठी त्या-त्या जागेचे आणि भाषेचे कलाकार निवडले आहेत. त्यामुळे पॅन इंडिया कास्टिंग झाले आहे. “JK” आणि “मूथू” यांच्यातील स्टेट वरून होणारी विनोदी बाचाबाची चांगली आहे. “JK” आणि “श्रीकांत” मधील शिव्याची चकमक विनोद निर्माण करते. “मूथू”, उमायल, चेल्लम, समीर, कल्याण, अरविंद, धृति, सूची, अथर्व, साजिद, “भास्करण”, “दीपन”, “सेल्वा”, “पीएम बासु” या सगळ्यांनी आप-आपली कामगिरी चोख बजावली आहे. प्रत्येक पात्राचा आलेख सुंदर रित्या मांडला आहे. प्रत्येक पात्राचे अस्तित्व ठळक जाणवते. धृतीला आई वडीला मधील भांडण सहन होत नाही. घरी सुख मिळत नसल्याने मग धृती बाहेर आनंद शोधते. धृती एका अॅक्शन sequence मध्ये अंगावर शहारे आणणारे दृश अभिनय करते. सीमा यांनी कठोर, कर्तव्य दक्ष आणि आत्मविश्वास युक्त पीएम छान साकारली आहे. सुची आणि अरविंदचा अभिनय सुद्धा चांगला आहे. सुची फक्त अरविंदचा समोर असेल तर खुष वाटते. “चेल्लम” सरांनी यात गूगल ची जागा घेतली आहे. “चेल्लम” ला सगळ्याच गोष्टी माहिती असतात.        

ही सिरिज हेरगिरी अ‍ॅक्शन थ्रिलर या प्रकारातील आहे. पहिला भाग एका निर्णायक टप्प्यावर संपला होता. पहिल्या सीजन च्या शेवटी काय घडले त्या कथेला योग्य न्याय देऊन या भागात संपवले आहे. सीजन २ मध्ये कथा, पटकथेवर छान काम आहे. पहिल्या तीन एपिसोड मध्ये कथेचा वेग कमी आहे पण शेवटचे दोन एपिसोड ही कसर भरून काढतात. विशेषत: क्लायमॅक्स आणि पोलिस स्टेशन वर हल्ला या दोन घटनांचा अॅक्शन क्रम अतिशय जबरदस्त रित्या चित्रित झाला आहे. प्रत्येक पात्राची कथा, चढ उतार, देहबोली आणि अभिनय या मुळे कथेला योग्य न्याय मिळतो. संगीत आणि पार्श्वसंगीत योग्य वापर केला आहे पण लक्षात राहील असे एकच गाणे आहे. पटकथा एकदम दमदार आहे. पहिल्या भागाचे कॉपी न करता दूसरा सीजन खराब होईल याची काळजी घेतली आहे. दिग्दर्शकाच्या जोडीने बऱ्याच ठिकाणी कमाल केली आहे. छोट्या-छोट्या गोष्टीची दखल सुद्धा घेतली आहे. कथेत विनोदी रंगाची धम्माल पेरणी केली आहे.             

“राजी”/“राजलक्ष्मी सेकरण” ही व्यक्तिरेखा “समंथा अककीनेनी ” साकारली आहे. तसे तिचे संवाद कमीच आहेत. पण प्रत्येक वेळेस तिच्या डोळ्यातून व्यक्त होणारी आग, बदल्याची भावना, संघर्ष, कठोरता, निर्दयीपणा, हिंसाचार, आणि तिच्यावर झालेले अन्याय, अत्याचार हे सगळे तिने ताकदीने साकारले आहे. श्रीलंकन असल्याने तिच्यावर, कुटुंबावर अन्याय होतो. तिच्यावर शारीरिक अन्याय कसा होतो. त्यानंतर तिने rebels च्या प्रशिक्षणा खाली घेतलेली भरारी आणि भावना संपून बनलेली घातक, क्रूर कमांडो. गवत कापल्या सारखे माणसे कापणारी घातक राजी. राजलक्ष्मी ते राजी हा प्रवास जरी दाखवला नसला तरी प्रेक्षकांना तो चटकन ओळखू येतो. या व्यक्तिरेखेचा कधी संताप, कधी दया, तर कधी द्वेष वाटतो. पण समंथा ने जबरदस्त काम केले आहे. पण दिग्दर्शकाने तिच्या त्वचेची कांति उगाच काळी दाखवली आहे. तिच्या वरील होणार्‍या शारीरिक अत्याचाराला ती ताकदीने बिमोड करते. संवाद कमी असले तरी हाव भाव, डोळे आणि अभिनयाने तिने मन जिंकले आहे.       

कथेत काही चुका सुद्धा आहेत. जसे की क्लायमॅक्स पर्यंत फक्त चार लोकांचा ग्रुप असतो. आणि क्लायमॅक्स मध्ये गोळीबार करताना चार पेक्षा जास्त लोकांना दाखवले आहे. “श्रीकांत” एका वर्षा करिता आयटी मध्ये कोणत्या पात्रतेच्या आधारावर काम करतो हे मात्र कळत नाही. औथेंटिक दाखवण्या साठी हिंदी सोडून दुसर्‍या भाषेचा(इंग्लीश सब-टाइटल सह) अति वापर केला आहे. पहीले ७ मिनिटे तर कळतच नाही की तमिळ व्हर्जन बघतोय का हिंदी. आत्ता पुढे चायनिज एजेंट विरुद्ध लढाई आहे त्यात मग चायनिज भाषेत संवाद दाखवणार का? पण पॅन इंडिया कास्टिंग, जबरदस्त अॅक्शन sequence, चांगली पटकथा, छोट्या-छोट्या गोष्टी मधून उत्कंठा वाढवणारी कथा, दमदार छायांकन, चांगले निर्मिती मूल्य, टिपिकल न होता विनोदाची पेरणी, त्यासोबत मध्यमवर्गीय लोकांचे जिव्हाळाचे प्रश्न, कथेची चांगली मांडणी, मैत्री, प्रेम, विश्वासघात, अन्याय, बदला, कुटुंब, देश आणि राजकारण यावर मार्मिक टिप्पणी करणारी पटकथा, त्यात पटकथेच्या माध्यमातून प्रत्येक व्यतिरेखाला मिळणारा न्याय आणि मनोज आणि समंथाचा उत्कृष्ट अभिनय यामुळे मी चित्रपटाला देतो 3.5 स्टार.  

नोट १ – नऊ एपिसोडची ही  ‘वेब सिरिज’ अमेझॉन प्राइम वर 4 जून ला प्रकाशित झाली आहेत. तिथे सिरिजचा आनंद लुटू शकता.

The Family Man Season 2

Views: 116

Leave a Reply