वृत्त वनहरिणी (८+८+८+८=३२)
इच्छा होती बेलाची लाखोळ वहावी मना सारखी
करू आरती निळकंठाची नजर असू दे जरा पारखी
प्रवास नव्हता मुळीच सोपा कष्ट खूप अन खूप अडथळे
लाखोळीचे नियम कडक अन किती सोवळे वेगवेगळे
धार्मिकतेचे वलय श्रावणी सश्रध्द स्वागत करीत असते
पाण्याचा अभिषेक चालतो काकड्यास गर्दी ही असते
बेल वाहण्यासाठी असतो काळ चांगला पहाट वेळी
मुहूर्त गाठायास करावी धावपळीची रोजच खेळी
नाम घोष ही अविरत चाले कीर्तनात हो अंग नाहले
कुणी येतसे जल अर्पाया ध्यान धारणा सदैव चाले
फळे-फुले शिवमूठ तिळाची बेल वाहता मनही रमले
श्रावण मासी भेटी साठी दूरदूरचे भक्त हि जमले
बेल वाहता अनेक विघ्ने डोळे मोठे करुनी आली
आलेली संकटे परंतू दुवा देत माघारी गेली
लाखोळीचा अनुभव सुंदर आहे खूपच विस्मयकारी
हे शिवशंभो नाथ कृपाळू दु:ख निवारी सर्वातोपरी
नोट : ही कविता गोदातीर्थ उपक्रमात सरावासाठी लिहिली आहे.
#गोदातीर्थ_समूह
#गोदातीर्थ
कविता: बेलाची लाखोळ
Views: 216
छान माहिती सरसंगणक बेसिक माहिती आणि तंत्रज्ञान माहिती नक्की बघा.
छान माहिती सरशिक्षक दिन विषयी संपूर्ण माहिती नक्की बघा
Thanks @Ganesh. तुमची शिक्षक दिन विषयी संपूर्ण माहिती नक्की बघतो.