कविता: आठवणींच्या डोहामध्ये

*वृत्त पादाकुलक – ८,८*
 
आठवणींच्या डोहामध्ये
शोधत आहे क्षण सोनेरी
सागरतीरी वाळूवरती
गणित मांडतो अधिक उण्याचे
 
मेहनतीने दुर्ग बनवले  
त्यावर पुन्हा पाणी फिरले             
तिथे मिळाले शंख शिंपले
सौख्य मनाचे त्यात शोधले
 
आल्या लाटा गेल्या लाटा
मनी सुखाची भरती आली
सुख दु:खाचा नाही फाटा
दु:ख मनाचे ओहट सरली  
 
वाळूवरती चिंतन करता  
आठवणींचा माग काढता
क्षण सोनेरी शोधत आहे
आयुष्याचा हिशोब करता
सागरतीरी वाळूवरती
आठवणींचा माग काढता
क्षण सोनेरी शोधत आहे
आयुष्याचा हिशोब करता

नोट : ही कविता गोदातीर्थ उपक्रमात सरावासाठी लिहिली आहे.
#गोदातीर्थ_समूह
#गोदातीर्थ

कविता: आठवणींच्या डोहामध्ये

Views: 57

Leave a Reply