अति-आज्ञेत होते संयमाची कठोर परीक्षा
जशी नात्यात असते दुसर्या कडून अपेक्षा
संयमानेच संयमाला मोजायचे असते
दुसरे मोजमाप काही जमायचे नसते
उतरत्या काळात संयम सोडायचा नसतो
उगवत्या काळात संयम वाढवायचा असतो
अति-कठीण काळात होते संयमाची ओळख
मजेत असताना होऊ द्यायचा नसतो काळोख
अंतरद्वंद्व असताना सोडायचा नसतो संयम
मनश्चक्षुनी उत्तर शोधून गाठू नवीन आयाम
Views: 144