कविता: आला पाऊस भरून

आला पाऊस भरून
गेला चकवा देऊन
कष्ट धन्याचे बघून
पीकं उमेद ठेवून
 
अति आतुर धरणी
उष्ण टाकते उसासे  
ढग मात्र नीर हीन  
लोक नाराज काहीसे
 
यंदा मुलीचे कर्तव्य
कसा कमावू रुपया  
वर्षा देऊन जाईल
वित्त थोडे अनं माया
 
आशा उमेद संपेना
अन्न मधुर लागेना  
रात्र कष्टाची सरेना  
वर्षा पुरेशी होईना 

नोट : ही कविता गोदातीर्थ उपक्रमात सरावासाठी लिहिली आहे.
#गोदातीर्थ_समूह
#गोदातीर्थ

आला पाऊस भरून

Views: 209

Leave a Reply