मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा मथुराचा एकुलता एक लाडका नातू होता. सुमेधचे वय ३ वर्ष होते आणि तो कायम आज्जी सोबत राहायचा. मथुरा त्याचे जमेल तसे लाड पुरवायची. बाजार जवळच्या मोठ्या गावी भरायचा. त्यांचा अत्यंत साध आणि टुमदार गाव होत. दोन बाजूला काही घर, आजूबाजूला शेत आणि एक मंदिर एवढंच काय ते गावात होतं. गावात भाजी विकून मथुरा आपल्या कुटुंबाला हातभार लावायची. त्यामुळे प्रत्येक आठवडी बाजारात भाजी विकून यायची. आज सुद्धा मथुरा बाजारात जाणार होती.तिचा भाऊ बरीच वर्षे भेटला नव्हता. तिला आठवत नव्हते की शेवटचे भाऊ कधी भेटला होता. त्यांचं नातं अवलकच्चं आंब्या सारखे होत. पिकलं म्हणावं तर पूर्ण पिकलेलं नाही आणि कच्चं म्हणावं तर पूर्ण कच्चं देखील नाही. दोन दिवसाखाली अधिक मासा निमित्त भाऊ सुद्धा येऊन गेला होता. भाऊ जरी असला तरी त्यांच्या गाठी भेटी खुपच कमी होत असत. त्यामुळे या भेटीची तिला खुप अपूर्वाई होती. भावाने कधी नाही ते अधिक मासा निमित्त पाचशे रुपये दक्षिणा दिली होती. हा तिच्या साठी अनपेक्षित धक्का होता. तिला असे वाटले की जून नात नवीन पालवी टाकत आहे तर आपण का माग राहावं. मग तिने भाच्याला 200 रुपये भेटी निमित्त दिले.
मथुरा दुपारच्या वेळी जवळच्या मोठ्या खेड्यात आठवडे बाजार करण्यासाठी गेली आणि तिने खेळण्याच्या दुकानात गाडीची किंमत विचारली. दुकानदाराने किंमत 400 रुपये सांगितली. मग मथुराने पाचशे रुपयाची नोट दिली आणि गाडी द्यायला सांगितली. पण दुकानदाराने सांगीतले ही 500 नोट चालत नाही 3 दिवसापासून. आत्ता ही नोट फक्त कागदाचा तुकडा आहे असे स्पष्टीकरण त्याने दिले. मथुरेला विश्वासच बसत नव्हता. मग तिने दुसर्याला दुकानदाराला विचारले आणि तेच अनपेक्षित उत्तर त्याने सुद्धा दिले. तिचे स्वप्न सत्यात न उतरता एक दु:ख स्वप्न झाले. तिने साठवलेले अर्धे पैसे तिने भावाच्या मुलाला दिले होते भेटी निमित्त. मथुरेला प्रश्न पडला की भावाने आपला विश्वासघात केला का नियतीने? पण या प्रश्नाचे उत्तर तिच्या कडे नव्हते. उदास मनाने ती घराकडे आपल्या स्वप्नांची लक्तरे घेऊन परतली.

Views: 33