लघुकथा : फर्निचर
नेहाआणि प्रथम त्यांच्या प्रिय घराचे फर्निचर करायचे होते. त्यासाठी तो बऱ्याच नामांकित कंपनी कडून माहिती काढत होता. आज एक नामांकित विक्रेता “निलेश” घर बघून फर्निचर ब्रांड आणि किंमत ठरवण्यासाठी आला होता. निलेशने मॉड्यूलर किचनची माहिती सांगण्यासाठी पूर्वी प्रथमने सांगीतले लहान मुलांना इजा न करणारे फर्निचर ब्रान्ड दाखवा. घरातील इतर फर्निचर सुद्धा लहान मुले केंद्रीत सांगा. निलेशने सगळ्या प्रकारच्या ब्रान्ड पुस्तिका दाखवल्या. पण प्रथम आणि नेहाला फक्त लहान मुले केंद्रित आणि सुख सोई युक्त फर्निचर निवडले.
निलेश या पालकांना बघून खूपच प्रभावित झाला आणि त्यांना म्हणाला “तुमच्या मुलांचे भाग्य असेल तुमच्या सारखे आई वडील त्यांना लाभले.” तुम्ही पालक मुलांना भरपूर वेळ देत असाल? प्रथम आणि नेहाचे खाडकन डोळे उघडले कारण मुलांसाठी त्यांनी भरपूर खर्च करून दाई ठेवली होती पण मुलांना दयायला त्यांच्या कडे वेळच नव्हता. पण त्याच दिवसा पासून प्रथम आणि नेहाने मुलांसाठी वेळ काढायला सुरुवात केली.
Views: 78