Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

आईचे ब्रह्मास्त्र

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / March 19, 2016
लेखआई ब्रह्मास्त्र लेख

प्रत्येक माणसाचे ईश्वराशी संवाद साधण्याचा कला वेगळी असते आणि गाऱ्हाण मांडायची पद्धत सुद्धा वेगळी असते. मा‍झ्या आईची पद्धत सुद्धा वेगळी आहे. देव काही कर्मकांडात अडकला नाही. आईने काही संगीतामध्ये शिक्षण घेतले नाही. आई जेव्हा घरातल्या देवाची पूजा मनापासून करते आणि सोबत भावगीत गाते. काय सांगू ऐकायला खुप छान वाटते. कारण आहे तिची देवावरील श्रद्धा. एखादा गायक रियाज करताना सुराला जसे आळवतो. त्याच प्रमाणे आई भावगीत गाऊन देवाला आळवते. हृदयातलली भक्ती गाणे रुपी भावातून गळ्यातून प्रकट होतात. जसे काही संगीत सेवा ईश्वरा चरणी रूजू करते. आई आणि घरातील देव त्या भक्तीरसा मध्ये नाहून निघतात आणि ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात.

आईचे ब्रह्मास्त्र Read More »

स्त्रिया आणि पुरुषाची खरेदी

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / March 14, 2016
लेखखरेदी लेख स्त्री

मी खुप वेळेस बालाजीला दर्शनासाठी गेलो आहे. त्या आठवणीतला एक किस्सा येथे देत आहे. एकदा मी बालाजीचे दर्शन घेऊन श्रीकालहस्तीला गेलो. तिथे मंदिरा बाहेर ओळीने बरीच दुकाने होती. मा‍झ्या पत्नीला भांड्याच्या दुकानात इडली पात्र दिसले. आम्ही किंमत विचारायला दुकानात गेलो. तिथे मला एक जाडजूड बाई ने तेलुगु मिश्रीत हिंदीत आवाज दिला “भैया आप कहा से आ रहे हो” मी तिला पुणे उत्तर दिल. ती नवऱ्याकडे बोट दाखवून समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाली. “इस आदमी को थोडा समझाओ लोग यहासे शॉपिंग करके सामान पुणे लेके जा रहे है और इसको हैदराबाद इतना नजदीक है फिरभी शॉपिंग को ना बोलता है”

स्त्रिया आणि पुरुषाची खरेदी Read More »

महादजी शिंदे छत्री – उत्कृष्ट स्मारक

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / February 16, 2016
लेखलेख स्मारक

मी हडपसर येथे राहतो. हडपसर पासून शिंदे छत्री 7 किमी वर वानवडी पुणे येथे आहे. बऱ्याच दिवसा पासून शिंदे छत्री भेट देण्याची इच्छा होती. एवढ्या जवळ असून सुद्धा मुहूर्त काही लागत नव्हता. एका रविवारी पत्नीची तुळशीबाग येथील खरेदी लवकर आटोपली मग आम्ही आमचा मोर्चा शिंदे छत्री इकडे वळवला. आपल्यावर आपल्या भावंडांचा खूप प्रभाव असतो. माझी मोठी भगिनी (सौ. गीता) तिला ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर पूर्ण माहीती मिळवण्याची धडपड असते. माझा सुद्धा हाच प्रयत्न असतो. 

महादजी शिंदे छत्री – उत्कृष्ट स्मारक Read More »

‘मृत्युंजय’ कर्ण आणि माझा प्रण

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / April 12, 2015
लेखकर्ण लेख

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

‘मृत्युंजय’ कर्ण आणि माझा प्रण Read More »

अन्नदानाची अवीट चव

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / February 22, 2015
लेखअन्नदान लेख

काही दिवसाखाली तिरूपतीला जायचा योग आला. तिथे तिरुमला तिरूपती देवस्थान तर्फे मोफत भोजनाची व्यवस्था राबवली जाते. मी तिथे बऱ्याच वेळेस भोजन ग्रहण केले आहे. बालाजीचे दर्शन झाल्या नंतर आमची पावले आपोआप तिकडे गेली. दर्शनाला मोठी रांग होती तेवढीच रांग भोजनालयात होती. पध्दतशीर रांग… 4 मोठे हॉल… माडून ठेवलेल्या टेबल आणि खुर्च्या… रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने…   हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग… वाढण्यासाठी मोठ्या  ट्राॅली…  तेथील जबरदस्त व्यवस्थापन… आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक…

अन्नदानाची अवीट चव Read More »

कॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 15, 2014
लेखकॅन्डी क्रश लेख

नवीन मोबाइल खरेदी केल्या नंतर बरेच जण अँप आणि विविध गेम्स डॉऊनलोड करतात. मी सुधा केले. त्यापैकी कॅन्डी क्रॅश सागा एक होता. मदतीला धावून येणारा तोच खरा मित्र. त्याप्रमाणे कॅन्डी क्रॅश मध्ये मला जे गूढ शोध विनंती(mystery quest request), जादा प्राण (extra life) पाठवतात तेच खरे माझे मित्र असे वाटते. त्यामुळेच माझा मित्रा वरचा विश्वास कॅन्डी क्रॅश सागा मुळे दृढ झाला आहे. जीवनात ध्येयं गाठण्यासाठी माणूस खुप प्रयत्न करतो पण देवाचे आशीर्वाद असतील तर तुम्ही ध्येयं लवकर मिळवतात. तसेच कॅन्डी क्रॅश सागा मध्ये तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी कधी-कधी देवाच्या आशीर्वादाची गरज भासतेच.

कॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस Read More »

आठवणीतील माणसे – आज्जी बाई

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 12, 2014
लेखआजी लेख

मी पुण्यात २००८-२००९ या वेळेत नवी पेठेत राहायचो. आम्ही तिथे ५ जण होतो. २ बेडरूम चा फ़्लँट होता. मी त्याआधी बँगलोर १.५ वर्ष राहून आलो होतो. मेस चे जेवण खाऊन आम्ही कंटाळलों होतो. मग त्यामुळे आम्ही तिथे स्वंयपाका साठी बाई शोधात होतो. आणि आमची ओळख आज्जीशी झाली.

वय वर्षे ५५.. नऊवारी नेसलेल्या.. कपाळी भलामोठं कुंकु.. चेहरयावर स्मितहास्य.. राहणी अत्यत साधी.. टापटीपपणा.. स्वछता.. स्वंयपाकाची आवड.. रोखठोक बोलणं.. आणि चोख हिशोब.. त्यानी लगेच दुसरया दिवसापासुन स्वंयपाकाला सुरुवात केली. आज्जीमुळे आम्हाला दररोज नवनवीन पदार्थ खायला भेटत. ५ जणा मध्ये माझ्या मित्राचा भाऊ लहान होता. त्याचे आजी खुप लाड करत. पहिल्या १० दिवसात त्यांना सगळ्याच्या खायच्या आवडी-निवडी कळल्या होत्या. आवडीनुसार त्या स्वच्छ, सात्विक जेवण बनवित. कधीहि त्या काम उरकायचे आहे म्हणून करत नसत. परिपूर्ण जेवण बनवण्यात त्यांच्या हाथखंडा होता. त्यांचा स्वंयपाकाला उत्कृष्ट चव होती. उकडीचे मोदक बनण्यात त्या तरबेज होत्या. आज्जी शिळे-अन्नाचा उपयोग खुप चागल्या पद्धतीने करत. दुसरया दिवशी त्या शिळे-अन्नाची अशी काही डिश बनवत की ते खाल्यानंतर असं कधी वाटलंच नाही कि हे शिळे-अन्न आहे. आम्ही पाचीजन लगेच डिश संपवत असत. नारळ असेल तर आज्जी नारळ फोडून उकडीचे मोदक बनवून घरून आणत. काका हलवाई कडे १५-२० रुपयाला मिळणारा मोदक आम्ही फुकटात खात असु. जेव्हा कधी मित्र किवां पाहुणे आले तर आज्जी टाळाटाळ न करता जेवण बनवत असत.

आठवणीतील माणसे – आज्जी बाई Read More »

← Previous 1 … 3 4

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe and receive notifications.

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • कविता
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १० February 22, 2026
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद January 6, 2026
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १ October 18, 2025
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५ September 6, 2025
  • महादेवा… August 18, 2025

RSS RSS

  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १०
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५
  • महादेवा…
  • कविता – नमवणार
  • गझल – थांबले नाही कुणी…
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote
 

Loading Comments...